Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिक्षणासंबंधी महत्वाचा करार! राज्यात विविध ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापन केले जाणार

केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला असून ज्याद्वारे राज्यात विविध प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहेत. करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 11, 2024 | 10:28 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा उतकृष्टता केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी मिळणार चालना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथे आज दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उत्कृष्टता केंद्र (CoE) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) झाला. या करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांसाठी राज्यात प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रे उभारली जाणार आहेत.

या करारावेळी रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंत्री  चंद्रकांत  पाटील उपस्थित होते.  तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आणि NIELIT चे महानिर्देशक डॉ. मदन मोहन त्रिपाठी, अभिषेक सिंग,अतिरिक्त सचिव आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.

विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. NIELIT शिक्षक व विद्यार्थ्यांना उद्योगांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम, क्रेडिट कोर्सेस, आणि प्लेसमेंट सहाय्यता यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.

राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण 2020 शी सुसंगत

या प्रसंगी  चंद्रकांत पाटील यांनी सदर उपक्रमाचा  शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी  महाविद्यालयांमधील  विद्यार्थ्यांनाकरीता सेंटर फॉर एक्सलन्स  ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश आहे. सदर सेंटर मार्फत  येणार अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण 2020 शी सुसंगत असल्याचे सांगितले.

सदर उपक्रम  राबविणारे महाराष्ट्र हे  देशातील प्रथम राज्य

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव  यांनी महाराष्ट्र राज्याला औद्योगिक  वारसा लाभलेला असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सर्वागिण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने  सदर उपक्रम  राबविणारे महाराष्ट्र हे  देशातील प्रथम राज्यआहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये  यशस्वीरित्या अंमलबजावणी करुन पुढे  देशभरात  सदर उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यातील 40 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये यापूर्वीच 6 तंत्रनिकेतनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT),  क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, तर 3 तंत्रनिकेतनांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रे कार्यरत केले आहेत. उर्वरित तंत्रनिकेतनांमध्येही उत्कृष्टता केंद्रे उभारण्याची शासनाची योजना आहे, जी या कराराच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर पूर्ण केली जाणार आहे.

Web Title: An important agreement between the center and the maharashtra state government regarding education various centers of excellence will be established in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 10:27 PM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
1

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.