Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज

AI College US: भारतीय वंशाचे इंजिनिअर दांपत्य अनुराधा आणि विकास सिन्हा यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास (UNT) ला १९० कोटी रुपयांचे ऐतिहासिक दान दिले आहे. त्यांच्या या दानातून नवीन AI कॉलेज उभारले जाणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 11, 2026 | 12:01 PM
ai collage

ai collage

Follow Us
Follow Us:

AI College US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या प्रवाशांनी आपल्या कर्तृत्वाचा, मोठ्या विचारांचा आणि उदारतेचा झेंडा रोवला आहे. भारतीय वंशाचे इंजिनिअर दांपत्य अनुराधा आणि विकास सिन्हा यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास’ (UNT) ला २ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे १९० कोटी रुपयांचे ($20M) ऐतिहासिक दान दिले आहे. या घसघशीत रकमेतून विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ॲडव्हान्सड ॲनालिटिक्सला समर्पित नवीन कॉलेज स्थापन केले जाईल.

विकास सिन्हा यांनी स्वतः २०२३ मध्ये UNT मधून आपली पीएचडी पूर्ण केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या महान योगदानाचा सन्मान करत नवीन संस्थेचे नाव ‘अनुराधा आणि विकास सिन्हा कॉलेज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड ॲडव्हान्सड ॲनालिटिक्स’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सामान्य कॉलेजमधून शिक्षणाची सुरुवात करून अमेरिकेची टॉप टेक इंडस्ट्री आणि शिक्षण क्षेत्रात एवढे मोठे यश मिळवणारे हे दांपत्य आज संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की कोण आहेत अनुराधा आणि विकास सिन्हा..

सिव्हिल इंजिनिअरिंग ते टेक क्षेत्रातील दिग्गज होण्याचा प्रवास

विकास आणि अनुराधा सिन्हा यांचे शालेय शिक्षण भारतात झाले. दोघांनी आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध ‘श्री वेंकटेश्वर युनिव्हर्सिटी’मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी घेतली होती. त्यानंतर उच्च शिक्षणाच्या स्वप्नासाठी ते अमेरिकेत पोहोचले आणि फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. विकास यांनी आपले शिक्षण सुरू ठेवत नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून आणि नंतर २०२३ मध्ये UNT मधून पीएचडी पूर्ण केली. सध्या विकास सिन्हा टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ब्रॉडकॉम’ (Broadcom) च्या मेनफ्रेम सॉफ्टवेअर डिव्हिजनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत.

या ऐतिहासिकदानावर आपली प्रतिक्रिया देताना विकास सिन्हा म्हणाले की, शिक्षणाने त्यांच्या आयुष्यात यशाचे मार्ग खुले केले होते. आता त्यांची इच्छा आहे की इतर विद्यार्थ्यांनाही अशा संधी मिळाव्यात. त्यांनी अभिमानाने सांगितले की, आमच्यासाठी ही भेट केवळ एक दान नाही. हे या गोष्टीचे प्रमाण आहे की, प्रवासी अमेरिकेत येऊन फक्त ‘अमेरिकन ड्रीम’ जगतात असे नाही, तर ते स्वप्न साकार करण्यात आणि घडवण्यातही आपली मोठी भूमिका बजावतात.

नवीन AI कॉलेज कसे असेल? दोन डिव्हिजनमध्ये करणार काम

हे नवीन कॉलेज प्रामुख्याने २ प्रमुख डिव्हिजन अंतर्गत काम करेल.

पहिली डिव्हिजन: ‘डिव्हिजन ऑफ अप्लाइड इंटेलिजन्स ॲंड इन्फॉर्मेटिक्स’. हे स्मार्ट आणि इंटेलिजेंट सिस्टीम्स प्रत्यक्ष जगात लागू करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

दुसरी डिव्हिजन: ‘डिव्हिजन ऑफ इन्फॉर्मेशन ॲंड लर्निंग ॲप्लिकेशन्स’, जे मनुष्य, समाज आणि संस्था एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा करतात हे समजून घेईल.

याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ AI चा युजर बनवणे हा नसून त्यांना ते तयार करण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि जबाबदारीने नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.

रिसर्च लॅब असेल खास

सिन्हा दांपत्य यांच्या या १९० कोटी रुपयांच्या योगदानातून ६ कायमस्वरूपी एन्डोमेंट फंड तयार केले जातील. याचा वापर गुणवंत विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, प्रोफेसरशिप, प्रगत संशोधन (Advanced Research) आणि तंत्रज्ञान इनक्यूबेशनसाठी केला जाईल. याशिवाय, कॅम्पसमध्ये ‘अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड डेटा सायन्स इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली जाईल, जी विद्यापीठाचे संशोधन थेट जागतिक टेक इंडस्ट्रीशी जोडेल.

Delhi Private School: खाजगी शाळांमध्ये ईडब्ल्यूएस कोट्यांतर्गत मोफत प्रवेशाची सुवर्णसंधी; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सुरू

यापूर्वीही दिले आहेत कोटींचे दान

विकास आणि अनुराधा सिन्हा यांचा UNT सोबतचा संबंध नवीन नाही. याआधी २०२४ मध्ये त्यांनी ‘अनुराधा आणि विकास सिन्हा डिपार्टमेंट ऑफ डेटा सायन्स’च्या सुरुवातीसाठी मोठा निधी दिला होता. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांनी ‘सिन्हा इनोव्हेशन लॅब फॉर डेटा सायन्स’ची स्थापना केली. आता २०२६ मधील हे २० दशलक्ष डॉलरचे दान शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात कोणत्याही भारतीय प्रवाशाने दिलेले सर्वात मोठे योगदान ठरले आहे.

Web Title: Anuradha vikas sinha donate 190 crore unt ai college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • AI technology
  • College
  • education

संबंधित बातम्या

Free digital education: लाखोंच्या कोचिंगची गरज संपली; ‘हे’ ५ शासकीय प्लॅटफॉर्म्स देतात IIT-IIM दर्जाचे शिक्षण अगदी फुकट
1

Free digital education: लाखोंच्या कोचिंगची गरज संपली; ‘हे’ ५ शासकीय प्लॅटफॉर्म्स देतात IIT-IIM दर्जाचे शिक्षण अगदी फुकट

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत
2

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर
3

iPhone 18 Pro Launch: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत बदलणार! ॲपलच्या नवीन आयफोनचे ‘हे’ दमदार फीचर्स ठरतील गेम-चेंजर

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न
4

CBSE Three Language Policy: सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; इंग्रजीच्या स्थितीवरही उपस्थित झाला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.