Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Art Exhibition: कलेचा अनोखा संगम! जे. जे. कॉलेजमध्ये सजले राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन; त्वरित भेट द्या

State Level Art Exhibition: 'विकसित भारत' संकल्पनेतून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सर जे. जे. कला महाविद्यालयात राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. १७ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 13, 2026 | 03:10 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘विकसित भारत’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना
  • हक्काचे व्यासपीठ आणि नवी दिशा
  • सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
    गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
State Level Art Exhibition: ‘विकसित भारत’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनामुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मक अभिव्यक्तीला नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेवा परमो धर्म:’ या उक्तीनुसार राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सर जे. जे. कला महाविद्यालय येथे झाला.

या कार्यक्रमाला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, वास्तुविशारद राजीव मिश्रा यांच्यासह विद्यार्थी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलात्मक अभिव्यक्ती, सर्जनशीलता आणि कला क्षेत्राविषयीची आवड वृद्धिंगत करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या कलात्मक वाटचालीला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला राज्यस्तरीय व्यासपीठ

या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा आणि कलात्मक अभिव्यक्तीचा आविष्कार घडवत विविध विषयांवर उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. या कलाकृतींमधून निवडलेल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या निर्मात्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकांसह पाच प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नवोदित कलाकारांना आपल्या कलाकृती व्यापक स्तरावर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

१६ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

सर जे. जे. कला महाविद्यालय, मुंबई येथे आयोजित हे चित्रकला प्रदर्शन शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, कलाप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा.

Web Title: Art exhibition seva sankalp abhiyan 2026 state level art exhibition jj college sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Art Exhibition
  • art festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.