Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News: आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार

आश्रमशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पाहावयास मिळाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 02, 2026 | 06:48 PM
आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार

आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : अतिदुर्गम व मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. मात्र, आश्रमशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पाहावयास मिळाला. या आश्रमशाळेतील विद्याथ्यांच्या जेवण सभागृहात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याने ही आश्रमशाळा आहे की, जनावरांचा गोठा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकताच २८ जानेवारी रोजी लाहेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ७२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. विषबाधित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी नागपूरच्या ‘एम्स’ रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या शाळेत २३० ते ३०० विद्यार्थी वसतिगृहात निवासी राहून शिक्षण घेत आहेत. हा भाग पूर्णपणे दुर्गम व जंगलव्याप्त असून, या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून कसोसीचे प्रयत्न केले जात आहे.

Purandar News: ‘त्या’ प्रकरणात तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई करावी; शेतकरी आक्रमक

आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवण, राहण्याची सोय उत्तम मिळावी, यासाठी शासनाकडून भरघोस निधी दिला जात आहे. असे असले तरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे मोकाट जनावरांच्या आश्रमशाळेतील शिरकाव केल्याच्या प्रकारावरून दिसून येते. लाहेरी आश्रमशाळेत भरदिवसा मोकाट जनावरांनी थेट विद्यार्थ्यांच्या जेवण सभागृहात ठिय्या मांडला. मात्र, या जनावरांना बाहेर हाकलून लावण्यासाठी आश्रमशाळेतील अधिकारी, कर्मचारी कुणीही पुढे आले नाही.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर पालकांचे प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, दिवसभर शिक्षक, कर्मचारी कर्तव्यावर असतात. असे असतानाही हा प्रकार घडत असेल तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विषबाधा प्रकरणामुळे आश्रमशाळेतील असुविधांचा प्रकार उघडकीस येत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे हित जोपासत त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलर्जीपणा करू नये, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

Web Title: Ashram school or cowshed students sitting in the dining hall like cows the scene from laheri ashram school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • Career News
  • Gadchiroli
  • Student

संबंधित बातम्या

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..
1

PIB Fact Check: विद्यार्थ्यांसाठी खरोखरच मोफत लॅपटॉप मिळतोय का? PIB फॅक्ट चेकने उघड केले मोठे सत्य; वाचा सविस्तर..

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन
2

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

Gadchiroli Snake Bite: गडचिरोलीत अंगावर काटा आणणारी घटना ! झोपेतच विषारी सापाचा 6 विद्यार्थिनींना दंश, तिघींचा मृत्यू
3

Gadchiroli Snake Bite: गडचिरोलीत अंगावर काटा आणणारी घटना ! झोपेतच विषारी सापाचा 6 विद्यार्थिनींना दंश, तिघींचा मृत्यू

Jharkhand Protest: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी
4

Jharkhand Protest: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.