Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्…; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Video Viral: दिल्लीतील माया विहार परिसरातील लवली हेरिटेज स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ती शाळेत चालत असताना अचानक जमिनीवर कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना वर्गातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 05, 2026 | 03:35 PM
वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्...; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

वर्गात चालत आली अन् अचानक खाली कोसळली, शिक्षिका उचायला गेल्या अन्...; 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील शाळेत तिसरीच्या विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू
  • चालता चालता जमिनीवर कोसळली
  • CCTV मध्ये घटना कैद
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका शाळेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. माया विहार परिसरातील लवली हेरिटेज स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला. प्रगती असे या चिमुरडीचे नाव असून शाळेत चालत असताना ती अचानक खाली झुकली आणि जमिनीवर कोसळली. या घटनेमुळे शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी अचानक कोसळल्याची घटना वर्गातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Video Viral)

रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत…

मिळालेल्या माहितीनुसार, माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमध्ये प्रगती तिसरीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी सकाळी शाळेत असताना ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने निर्मान विहार येथील मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. अवघ्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने शाळा प्रशासन आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

CCTV फुटेजमध्ये नेमके काय दिसले?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या CCTV फुटेजमध्ये विद्यार्थिनी अचानक हळूहळू खाली झुकताना दिसत आहे. काही क्षणांतच ती जमिनीवर कोसळते. या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विद्यार्थिनी नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली आणि तिच्या मृत्यूमागील कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळी 9:52 वाजता पोलिसांना मिळाली माहिती

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 9:52 वाजता पीसीआरला या घटनेची माहिती देणारा फोन आला. माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमधील ९ वर्षीय विद्यार्थिनीला निर्मान विहार येथील मलिक रेडिक्स हेल्थ केअर रुग्णालयात आणण्यात आले असून, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासाचा भाग म्हणून वर्गातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनी अचानक कोसळल्याचे दिसून आले आहे.

9-year-old Indian girl DIES after collapsing in Delhi classroom Police are investigating — the school principal says she suffered a cardiac arrest, the exact cause of death is yet to be established https://t.co/DUU3QSI5Xx — RT (@RT_com) November 4, 2026

दिल्ली पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या घटनेमागील नेमकी परिस्थिती समजून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सविस्तर तपास केला जात आहे. विद्यार्थिनीच्या पालकांचे तसेच शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. CCTV फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, ९ वर्षीय विद्यार्थिनीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

‘विद्यार्थिनीला अचानक कार्डियक अरेस्ट आला’

“ही अत्यंत दुःखद घटना आहे. विद्यार्थिनीला अचानक कार्डियक अरेस्ट आला. ती वर्गात स्वतःहूनच खाली कोसळली. आम्ही तातडीने तिला रुग्णालयात घेऊन गेलो. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही विद्यार्थिनी खेळून वर्गात परत येत होती.”

— प्राचार्या, लवली हेरिटेज स्कूल

Delhi Viral Video : दिल्लीच्या रस्त्यावर धूर फवारणारी गाडी पाहून ब्रिटिश व्लॉगरला धक्का; म्हणाला, ‘भारत सर्वात वेडा देश!’

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीतील शाळेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव काय आहे?

    Ans: प्रगती असे या ९ वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून ती माया विहार येथील लवली हेरिटेज स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होती.

  • Que: विद्यार्थिनीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी शाळेत चालत असताना अचानक हळूहळू खाली झुकली आणि जमिनीवर कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. CCTV फुटेज तपासण्यासह पालक आणि शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

Web Title: Delhi school 9 year old girl dies suddenly cctv footage sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • delhi
  • School
  • Student
  • viral video

संबंधित बातम्या

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी
1

Delhi Building Collapse: दिल्लीतील चावडी बाजारात भीषण दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, NDRF घटनास्थळी

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!
2

Viral Video: फोनच्या नादात आईकडून भयंकर चूक; बाळाला फ्रिजमध्ये ठेवलं अन्…; पुढे जे घडलं ते फारच भयानक!

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा
3

Viral Instagram Video : दिवाळी गिफ्टचा भन्नाट सरप्राइज! दिल्लीतील कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16, सोशल मीडियावर चर्चा

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण
4

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.