ATREE कडून सीएएसएफओएस कोईम्बतूरच्या प्रशिक्षणार्थी, गवताळ प्रदेश महत्त्वाचे का आहेत?
मुंबई: वेस्टब्रिज कॅपिटलचे पाठबळ असलेल्या अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायरोन्मेंट (एट्री) येथील सेंटर फॉर पॉलिसी डिझाइन (सीपीडी)ने द ग्रासलँड्स ट्रस्ट (टीजीटी) आणि वन विभाग, महाराष्ट्र यांच्यासोबत सहयोगाने सेंट्रल अकॅडमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्विसेस (सीएएसएफओएस), कोईम्बतूर मधील ४२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी गवताळ प्रदेश संवर्धन स्थळांना भेटीचे आयोजन केले.
वनसंरक्षक व सीएएसएफओएसचे फॅकल्टी सदस्य अनिष कलकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गवताळ प्रदेश पर्यावरणशास्त्र, वन्यजीव निरीक्षण आणि परिसंस्था संवर्धन करण्याच्या क्षेत्रातील उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले. ही भेट महाराष्ट्रातील सुपे येथून सुरू झाली, जेथे टीजीटी आणि एट्रीमधील टीम्सनी, तसेच सुपे रेंज ऑफिस आणि श्रीमती जयश्री पवार (सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव, पुणे विभाग) यांनी चालू असलेल्या संवर्धन कार्याबद्दल आणि गवताळ प्रदेश व्यवस्थापनासाठी सहयोगी दृष्टिकोनांबद्दल माहिती दिली.
भारतातील गवताळ प्रदेश महत्त्वाचे आहेत पण विद्यमान भू-वापर आणि धोरणात्मक आराखड्यामधील तफावतीमुळे अनेकदा दुर्लक्षित केलेले परिसंस्था आहेत. या दुर्लक्षामुळे ते जमिनीचे रूपांतर, ऱ्हास आणि खंडित प्रशासनाला बळी पडतात. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी, तसचे ग्रामीण उपजीविका आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या पशुधन, दुग्धव्यवसाय, लोकर, मांस, अक्षय ऊर्जा आणि पर्यटन यासारख्या उद्योगांना टिकवून ठेवण्यासाठी या अर्ध-शुष्क भूप्रदेशांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रशिक्षण सीएएसएफओएस अधिकाऱ्यांना भारताच्या पर्यावरणीय आणि आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या, पण दुर्लक्ष करण्यात आलेल्या परिसंस्थांना ओळखण्यासाठी, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुसज्ज करते.
एट्री- सेंटर फॉर पॉलिसी डिझाइनचे संचालक डॉ. अबी तमिम वनक म्हणाले, “भारतातील अर्ध-शुष्क गवताळ प्रदेश सर्वात धोक्यात असलेल्या परिसंस्थांपैकी एक आहेत. भविष्यातील वन अधिकाऱ्यांना त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि संवर्धनाचे बारकावे समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देणे हे माहितीपूर्ण व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्र भेटीमधून संवर्धनाकरिता विज्ञान, धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी एकत्र येण्यासाठी आवश्यक असलेली सहयोगात्मक भावना दिसून येते.”
सुपे नर्सरीमध्ये, फील्ड टीमने गवत प्रसार तंत्र आणि नर्सरीमधील (रोपवाटिका) कार्यसंचालनांचे प्रात्यक्षिक दाखवले, त्यानंतर संपूर्ण प्रदेशात राबवण्यात येणाऱ्या संवर्धन प्रकल्पांबाबत माहिती सांगितली. दुपारच्या जेवणानंतर टीमने गुलुंचेला भेट दिली, जेथे त्यांनी गेल्या वर्षभरात साइट संरक्षण आणि नैसर्गिक पुनरुत्पादनाच्या सकारात्मक परिणामांचे निरीक्षण केले. सीएएसएफओएस शिष्टमंडळाने आभार मानून दिवसाचा समारोप केला, जेथे पर्यावरणीय संवर्धन करण्यासाठी फील्ड टीम्सच्या कटिबद्धतेचे कौतुक करण्यात आले.
कौतुक व्यक्त करत अनिष कलकूर म्हणाले, ”नागरी समाज संघटना, वन विभाग आणि स्थानिक समुदायांच्या या अनोख्या संयुक्त उपक्रमांमधून आम्हाला मौल्यवान शिकवण आणि माहिती मिळाली आहे. सीएएसएफओएस कोइम्बतूरच्या ३०व्या एसएफएस बॅचच्या वतीने, मी ही माहितीपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एनसीबीएस, एट्रीआणि द ग्रासलँड्स ट्रस्टचे आभार मानतो.”
ही भेट एट्री-सीपीडीच्या गवताळ प्रदेश, सवाना, वाळवंट इत्यादी ओपन नॅचरल इकोसिस्टम्स (ओएनई) व्यवस्थापित करण्यासाठी पुराव्यावर आधारित आराखडा विकसित करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना विज्ञान-आधारित आणि समुदाय-नेतृत्वाखालील संवर्धन मॉडेल्सचा प्रत्यक्ष अनुभव देत या उपक्रमाचा दीर्घकाळात गवताळ प्रदेश आणि इतर कमी मान्यताप्राप्त, पण महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण व शाश्वत व्यवस्थापन मजबूत करण्याचा मनसुबा आहे. वेस्टब्रिज कॅपिटलने एट्री येथे सेंटर फॉर पॉलिसी डिझाइनची निर्मिती, स्थापना व कार्यसंचालनासाठी आर्थिक साह्य केले आहे. हे केंद्र पर्यावरणीय विज्ञानाचे धोरण आणि सरावात रूपांतर करण्यावर लक्ष केंद्रित करते, जे मोठ्या प्रमाणात संवर्धन परिणामांना सक्षम करते.
वेस्टब्रिज कॅपिटलने एट्रीचे व्यापक कौशल्य, ज्ञान व अनुभवामधून प्रेरणा घेत २०१९ मध्ये सायन्स-पॉलिसी-प्रॅक्सिसदरम्यान संवादाला चालना देण्यासाठी आणि देशामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या व पर्यावरणदृष्ट्या सुदृढ धोरणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सेंटर फॉर पॉलिसी डिझाइनची स्थापना केली.
जवळपास तीन दशकांपासून एट्रीने संवर्धन आणि शाश्वततेसाठी धोरण आणि सरावांना माहिती देण्यासाठी कठोर आंतरविद्याशाखीय माहिती निर्माण केली आहे. एट्री विविध धोरणात्मक भागधारकांशी संवाद साधते, जेणेकरून दीर्घकालीन गरिबी व असमानतेचे निराकरण करताना भूदृश्यांचे संवर्धन आणि परिसंस्थेच्या सेवा टिकवून ठेवण्यामधील तडजोडींना संतुलित करता येईल. यापैकी बरेच धोरणात्मक हस्तक्षेप एट्रीची व्यापक माहिती आणि पाण्याचा दर्जा व व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन, वन अधिकार व प्रशासन आणि आक्रमक प्रजाती यांसारख्या मुद्दयांशी दीर्घकालीन सहभागामुळे उदयास आले आहेत.
• परिसंस्थेचे संवर्धन
• वन प्रशासन
• पाणी व समाज
• आक्रमक प्रजाती
• जैवविविधता संवर्धन