पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी, आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी करा अर्ज (फोटो सौजन्य-X)
पदवीधर उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असून रेल्वे सेक्शन कंट्रोलर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय २० वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गासाठी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. कृपया लक्षात ठेवा की वय १ जानेवारी २०२६ पासून मोजले जाईल.






