सैनिक शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाला सैनिक शाळेत दाखल करायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करावे. कारण शिवाची तारिक ३० ऑक्टोबर पर्यंत आहे. वर ६वि आणि ९ वि साठी प्रवेश घेण्यात येत आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
कुठे कराल अर्ज?
सैनिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अर्ज करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला सैनिक शाळेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागेल. exams.nta.nic.in/sainik-school-society या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकता.
परीक्षा कधी?
सूचनेनुसार, सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. अर्ज फॉर्म दुरुस्त करण्याची वेळ २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान खुली असेल. सैनिक शाळा प्रवेश परीक्षा जानेवारीमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास AISSEE २०२६ द्वारे देशभरातील ३३ प्रमुख सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश मिळेल. परीक्षेच्या काही काळापूर्वी प्रवेशपत्रे जारी केली जातील. ही परीक्षा एकूण १९० शहरांमध्ये घेतली जाणार आहे.
रजिस्ट्रेशन फीस किती?
मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज शुल्कात वाढ झाली आहे. जनरल, ओबीसी (एनसीएल), संरक्षण आणि माजी सैनिकांसाठी नोंदणी शुल्क ₹८५० आहे. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹७०० आहे.
वयोमर्यादा काय ?
वयोमर्यादेबाबत, इयत्ता सहावीसाठी, वय ३१ मार्च २०२६ रोजी १० ते १२ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. इयत्ता नववीसाठी, वय ३१ मार्च २०२६ रोजी १३ ते १५ वर्षे दरम्यान असावे.
परीक्षेचा पॅटर्न जाणून घ्या
माहितीनुसार, इयत्ता सहावीची परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह १३ माध्यमांमध्ये घेतली जाईल. परीक्षेसाठी एकूण १५० मिनिटे दिली जातील. एकूण ३०० गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. दरम्यान, इयत्ता नववीच्या परीक्षेसाठी १८० मिनिटे असतील. ही परीक्षा एकूण ४०० गुणांची असेल.
भारतीय सैन्यात व्हा भरती! ग्रुप सी पदासाठी करा अर्ज
भारतीय सैन्यात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आली आहे. भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयाने (DG EME) विविध ग्रुप C नागरी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६९ पदे भरली जाणार असून, त्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), धोबी, स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि ज्युनियर टेक्निकल क्लर्क ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर अशा विविध पदांचा समावेश आहे.
छोट्या गावातून येणाऱ्या पठ्ठया झाला IAS! कष्ट असावे तर असे…