
dinvishesh
August 18 History : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान नेते आणि अफाट साहसी क्रांतिकारक म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा!’ या ओघवत्या घोषणेने संपूर्ण देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याची नवी ज्योत पेटवली. ब्रिटिशांना त्यांच्याच देशात जाऊन सळो की पळो करून सोडण्यासाठी त्यांनी ‘आझाद हिंद फौजेची’ पुनर्रचना आणि यशस्वी नेतृत्व केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि ‘जय हिंद’चा नारा देत भारतीयांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत निर्माण केली. त्यांचे हे असीम त्याग, देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.