Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Baroda 2026: बँक ऑफ बड़ौदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अप्लाय!

Bank of Baroda IT Recruitment 2026: बँक ऑफ बड़ौदाने आयटी विभागातील वरिष्ठ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे. पात्रता आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 02, 2026 | 11:06 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • बँक ऑफ बड़ौदाच्या या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
  • ही नियमित सरकारी नोकरी आहे का?
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Bank of Baroda IT Recruitment 2026: सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बड़ौदाने (Bank of Baroda) नवीन भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. मात्र, ही भरती सामान्य लिपिक किंवा प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी नसून, बँकेच्या आयटी (IT) विभागातील वरिष्ठ पदे भरण्यासाठी आहे.

बँकेला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रात अनुभवी प्रोफेशनल्सची गरज आहे. विशेष म्हणजे, या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांच्या करारावर केली जाईल. चांगला परफॉर्मन्स आणि बँकेच्या गरजेनुसार हा करार पुढे वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे आयटी क्षेत्रात आधीपासूनच काम करत असलेल्या अनुभवी तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

या पदांवर निघाली आहे भरती:

१. डिप्टी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (Dy. CTO): या पदावर बँकेचे तांत्रिक सिस्टीम, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि आयटी धोरणाशी संबंधित कामांची जबाबदारी असेल.
२. हेड AI: या पदावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगशी संबंधित तंत्रज्ञान बँकिंग सेवांमध्ये लागू करण्याचे काम असेल.
३. डिप्टी हेड क्लाउड CoE: या पदावर क्लाउड कॉम्प्युटिंगशी संबंधित सिस्टीम आणि तांत्रिक पायाभूत सुविधा सांभाळण्याची जबाबदारी असेल.
४. डिप्टी हेड प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग: या पदावर बँकेचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इंजिनिअरिंग सिस्टीमच्या विकासाची व व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

हे उमेदवार करू शकतात अर्ज:

डिप्टी CTO साठी उमेदवाराकडे संबंधित इंजिनिअरिंग विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री असणे आवश्यक आहे. यासोबतच किमान १५ वर्षांचा संबंधित अनुभव आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर किमान ३ वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.

हेड AI साठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा संबंधित विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री असावी. तसेच एकूण १२ वर्षांचा अनुभव आणि AI, NLP व कंटेंट अनालिसिसमध्ये किमान ६ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

डिप्टी हेड क्लाउड मध्येही संबंधित इंजिनिअरिंग विषयात BE/BTech किंवा MCA च्या डिग्रीसह किमान १० वर्षांचा अनुभव असावा. यामध्ये ५ वर्षांचा अनुभव क्लाउड कॉम्प्युटिंगमधील असणे गरजेचे आहे.

डिप्टी हेड प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंगसाठी संबंधित विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री आणि किमान १० वर्षांचा तांत्रिक अनुभव असणे आवश्यक आहे.

तीन वर्षांचा असेल करार :

या पदांवर नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांसाठी केली जाईल. बँकेच्या नियमांनुसार, चांगला परफॉर्मन्स आणि बँकेच्या गरजेच्या आधारावर हा करार दरवर्षीप्रमाणे वाढवला जाऊ शकतो. कराराचा जास्तीत जास्त कालावधी पाच वर्षांपर्यंत असू शकतो. ही नियमित सरकारी बँकेची नोकरी नसून, निश्चित काळासाठीची कंत्राटी भरती आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी या सर्व अटी आणि शर्ती जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

असा करा अर्ज:

इच्छुक उमेदवार बँक ऑफ बड़ौदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
१. सर्वात पहले बँक ऑफ बड़ौदाची अधिकृत वेबसाइट उघडा.
२. त्यानंतर ‘Careers’ सेक्सनमध्ये जाऊन ‘Current Opportunities’ वर क्लिक करा आणि जाहिरात क्रमांक (ADVT/2026/18) निवडा.
३. संबंधित पदाची पात्रता आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
४. त्यानंतर ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
५. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा डिजिटल प्रत सुरक्षित ठेवा.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२६ ही आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बँक ऑफ बड़ौदाच्या या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?

    Ans: ज्या उमेदवारांकडे आयटी (IT) किंवा कॉम्प्युटर सायन्स संबंधित विषयात BE/BTech किंवा MCA ची डिग्री आहे आणि संबंधित क्षेत्रात आवश्यक कामाचा अनुभव आहे, असे अनुभवी तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • Que: ही नियमित सरकारी नोकरी आहे का?

    Ans: नाही, ही नियमित सरकारी नोकरी नसून निश्चित काळासाठीची (कंत्राटी/Contract) भरती आहे. सुरुवातीला नियुक्ती ३ वर्षांच्या करारावर केली जाईल, जी गरजेनुसार आणि परफॉर्मन्स पाहून ५ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

  • Que: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: बँक ऑफ बड़ौदाच्या आयटी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२६ ही आहे.

Web Title: Bank of baroda it recruitment 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Career
  • Contract Basis Job

संबंधित बातम्या

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू
1

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!
2

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!

NEET PG 2026 Update: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा ट्रेंड बदलला? नीट पीजीच्या पहिल्या फेरीत ‘या’ अभ्यासक्रमाने मारली बाजी
3

NEET PG 2026 Update: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा ट्रेंड बदलला? नीट पीजीच्या पहिल्या फेरीत ‘या’ अभ्यासक्रमाने मारली बाजी

भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! Air Marshal Vikram Gaur यांची ‘अतिरिक्त सचिवपदी’ नियुक्ती
4

भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! Air Marshal Vikram Gaur यांची ‘अतिरिक्त सचिवपदी’ नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.