फोटो सौजन्य - Social Media
भारतीय मानक ब्यूरो (BIS) ही भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली राष्ट्रीय मानक संस्था आहे. BIS मार्फत देशभरात विविध वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांवर वेळोवेळी भरती प्रक्रिया राबवली जाते. यंदा BIS ने Scientist-B पदासाठी भरतीची थोडक्यात अधिसूचना जाहीर केली असून, इच्छुक उमेदवारांना ही एक चांगली संधी आहे. या भरतीअंतर्गत एकूण 20 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही थोडक्यात अधिसूचना 3 ते 9 मे 2025 च्या रोजगार समाचारमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिकृत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू होऊन 23 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी या कालावधीत [www.bis.gov.in](https://www.bis.gov.in) या BIS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा.
BIS शास्त्रज्ञ-B पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असावी. वयोमर्यादा मोजण्याची महत्त्वाची तारीख 23 मे २०२५ ही आहे. आरक्षण नियमांनुसार SC/ST/OBC/PwD/Ex-Servicemen उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया चार प्रमुख टप्प्यांत होईल:
अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
शास्त्रज्ञ बनण्याची इच्छाशक्ती आणि शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी BIS Scientist-B भरती 2025 ही एक उत्तम संधी आहे. सरकारी नोकरी, चांगले वेतनमान आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा मान यासाठी ही भरती उपयुक्त ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि संधीचा फायदा घ्या!