फोटो सौजन्य - Social Media
स्वप्न पाहावे तर असे. जिद्द असावी तर अशी. महत्वकांक्षा असावी तर अशी आणि मेहनत असावी तर अशी. आयुष्यत बदल हवा असेल तर कोणताही विचार न करता येणाऱ्या प्रत्येक प्रसांगाला सामोरे जाऊन आयुष्यात फार मोठा आणि सकारात्मक बदल घडवता येऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण IPS अधिकारी Dr.अदिती उपाध्याय यांच्या संघर्षगाथेतून मिळते. अदिती राजस्थान पोलिस दलातील नव्या “लेडी सिंघम”पैकी एक आहेत. खरं तर, त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील आहेत. परंतु, त्यांनी चिकाटीने UPSC ची परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण करत देशात १२७ वी रँक मिळवत IPS पदी स्वतःचे नाव नोंदवले आहे आणि सध्या ते राजस्थान कॅडरमध्ये रुजू आहेत.
आदिती यांनी आधी कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. अदिती एक डेंटल डॉक्टर आहेत आणि आधी त्या एका क्लिनिकमध्ये रुग्णांना डेंटल सेवा देत होते. कुटुंबाच्या इच्छेखातीर त्यांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले आणि फुल-टाईम डेंटिस्ट म्हणून काम सुरू केलं. हे करता करता त्यांनी त्यांची इच्छा जोपासून ध्येय गाठण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली. दिवसा त्या क्लिनिकमध्ये रुग्णांची सेवा करत असत तर रात्री स्पर्धा परीक्षेची तयारी करत असे. त्यांनी घेतलेले हे कष्ट मार्गी लागले आणि आदिती १२७व्या रँकने UPSC उत्तीर्ण झाल्या.
आदितींकडून शिकण्याची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आदिती यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस घेतले नाही. त्यांनी स्वतःच्या दमावर अभ्यास केला. विविध पुस्तके वाचली. इंटरनेटवर असणारे मोफत Stuff चा फायदा घेतला आणि चिकाटीने स्वप्न सत्यात उतरवले. मुलाखतीअगोदर त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये राजीनामा दिला आणि अतिशय आत्मविश्वासाने येऊन मुलाखत पार केली. त्यामुळे त्यांना लेडी सिंघम या नावानेही ओळखले जाते. मुळात, त्यांची कथा तरुणांसाठी प्रेरणादायी असून, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर काहीही शक्य आहे हे दाखवते.