Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MPSC ची परीक्षा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार

MPSC News: आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली होती. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुमारे १०५ दिवसांचा कालावधी लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 07:37 PM
Big Breaking: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MPSC ची परीक्षा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार
Follow Us
Follow Us:

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली
आयोगाने घेतली होती ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा
मुख्य परीक्षा होणार होती २९ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी कमी वेळ मिळत असल्याची दखल घेत आयोगाने गुरुवारी सुधारित वेळापत्रक (Career News) जाहीर केले.

आयोगाच्या पूर्वीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार ही मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिल या कालावधीत होणार होती. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ ही परीक्षा ५ एप्रिल ते २ मे २०२६ या कालावधीत घेतली जाणार असल्याचे आयोगाचे उपसचिव (जाहिरात) सं. पां. देशमुख यांनी शुद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

आयोगाने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली होती. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी सुमारे १०५ दिवसांचा कालावधी लागला. निकाल उशिरा लागल्याने २९ मार्चपासून नियोजित असलेल्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांकडे अवघे ३० दिवसांचा कालावधी उरला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आयोगाकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आल आहे.

MPSC News: ‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष; विवेक भिमनवर यांची नियुक्ती

‘एमपीएससी’ला मिळाले नवीन अध्यक्ष

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज महत्त्वाची अधिसूचना जारी केली असून, भारतीय संविधानाच्या कलम ३१६ (९) नुसार राज्यपालांच्या अधिकाराने विवेक लक्ष्मीकांत भिमनवर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राज्य प्रशासनिक सेवेतील अधिकारी असून, त्यांच्या नियुक्तीचा आदेश (Career) आजपासून लागू झाला आहे. भिमनवर हे विद्यमान अध्यक्ष ६२ वर्षे पूर्ण होणे किंवा त्यांचा कार्यकाळ संपणे यापैकी जे आधी होईल तोपर्यंत पदावर कार्यरत राहणार आहेत. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त म्हणूनही कामकाज पाहिले आहे. अध्यक्षपदी भिमनवर यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

एमपीएससी अध्यक्षपद ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. राज्यातील विविध सरकारी सेवांसाठी भरती परीक्षा, त्यांचे धोरणात्मक नियोजन, पारदर्शकता आणि संचालनाची जबाबदारी आयोगाकडे असते. त्यामुळे नव्या अध्यक्षाकडून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि भरती प्रक्रियेत सुधारणा या अपेक्षा वाढणार आहेत.

Web Title: Mpsc state services mains exam will be held from april 5 to may 2 career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Career News
  • MPSC
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी
1

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
2

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
3

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
4

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.