Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु! ऐनवाडी येथे नववी-दहावीचे वर्गांना ‘या’ तारखेपासून सुरुवात

आतापर्यंत आठवीपर्यंतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. या पार्श्वभूमीवर ऐनवाडी येथील शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू करण्याचे आदेश दिले जाणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू करण्याचे आदेश
  • शिक्षण जवळच्या ठिकाणी मिळावे यासाठी सर्व जिल्हा परिषदांमार्फत विशेष मोहीम
  • स्थानिक पातळीवरच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी–धनगरवाडी हा डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने तेथील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंतच शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लांब अंतर पार करावे लागते. या पार्श्वभूमीवर ऐनवाडी येथील शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग विशेष बाब म्हणून सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ दिले जातील, अशी माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री Shambhuraj Desai यांनी दिली.

Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

विधानसभेत लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना Vinay Kore यांनी ऐनवाडी परिसरातील शैक्षणिक सुविधांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरवर जावे लागते. यामुळे विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी जावे लागू नये आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे पटसंख्या कमी असली तरी अशा भागांमध्ये जवळच्या ठिकाणी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेला आवश्यक सूचना देण्यात येतील.

तसेच डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जवळच्या ठिकाणी मिळावे यासाठी सर्व जिल्हा परिषदांमार्फत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय अशा उपक्रमांचा समावेश नवीन समग्र शिक्षण धोरणात करण्याचा विचारही शासन पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न

या निर्णयामुळे ऐनवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: When will ninth and tenth classes be started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Career News
  • education

संबंधित बातम्या

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
1

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Purnima vs Teachers Day Difference:  गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
2

Purnima vs Teachers Day Difference: गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश
3

Indian Army Success Story : ॲमेझॉनमधील ४६ लाखांचे पॅकेज सोडले अन् धरली सैन्याची वाट; ८ व्या प्रयत्नात मिळवले भारतीय सैन्यात यश

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर
4

Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण किती झाले होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.