भारतात AI-संचालित शिक्षण सुलभ करण्यासाठी बिटसॉम टेस्ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्स लाँच
भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय सुरू करत, बिटसॉमने मसाई (Masai) सोबत भागीदारीत ऑल इंडिया बिटसॉम टेस्ट फॉर ऑनलाइन प्रोग्राम्स (TOP-2025) च्या लाँचची घोषणा केली आहे. ही देशव्यापी ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध व्यावसायिक प्रोग्राम्ससाठी पात्र होण्याची आणि आपल्या पसंतीचा कोर्स निवडण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
ही परीक्षा 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार असून, ती गुण-आधारित कोर्स निवड मॉडेलवर आधारित असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारे आवडता प्रोग्राम निवडता येईल. या उपक्रमाचा उद्देश शिक्षणाच्या विविध मार्गांना एकत्र आणून व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान शिक्षण अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करणे हा आहे.
या परीक्षेद्वारे विद्यार्थी बिटसॉमच्या सहा महिन्यांच्या ऑनलाइन प्रोग्राम्स, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स, फिनटेक आणि डिजिटल मार्केटिंगसाठी अर्ज करू शकतात. या सर्व कोर्सेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा महत्त्वपूर्ण समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना AI-संचालित साधनांचा वापर, विश्लेषण आणि निर्णय घेण्यातील स्किल्स आत्मसात करता येते.
5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच
बेन अँड कंपनीच्या अहवालानुसार, भारतातील AI उद्योग २०२७ पर्यंत २.३ दशलक्ष रोजगार निर्माण करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तंत्रज्ञान-केंद्रित व्यावसायिक शिक्षणासाठी मोठी मागणी निर्माण झाली आहे. बिटसॉमच्या या प्रोग्राम्समुळे एआयचा वापर आणि रोजगार वाढ या दोन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होताना दिसतात:
डिजिटल मार्केटिंग: वार्षिक ३०% रोजगार वाढ, तर कॅम्पेन ऑटोमेशनमध्ये ६५% एआय अवलंब
प्रॉडक्ट मॅनेजमेंट: २५% रोजगार वाढ, आणि उत्पादन संशोधनात ६५% एआय वापर
बिझनेस ॲनालिटिक्स: २५% रोजगार वाढ, तसेच डेटा विश्लेषण आणि अंदाज बांधणीत ८०% एआय अवलंब
फिनटेक: ३०% रोजगार वाढ, आणि फसवणूक ओळख व जोखीम व्यवस्थापनात ६०% एआयचा वापर
या प्रगतीमुळे एआय-कौशल्य असलेल्या व्यावसायिकांसाठी नवे रोजगाराचे दरवाजे उघडले आहेत. या उपक्रमाबाबत मसाईचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिक शुक्ला म्हणाले,
“हा उपक्रम भारतातील दर्जेदार आणि एआय-संचालित शिक्षण अधिक सुलभ करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान नवीन कौशल्यांची मागणी वाढवत असताना, आम्ही विद्यार्थ्यांना निष्पक्ष आणि गुणवत्ताधारित संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. ‘टॉप-२०२५’ परीक्षा केवळ स्थितीवर नव्हे, तर मेरिट आणि क्षमतेच्या आधारे टॅलेंट ओळखण्यासाठी डिझाइन केली आहे, ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आकांक्षांशी आणि वेगाने बदलणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडलेले शिक्षण मिळेल.”