फोटो सौजन्य: @MotorBeam/X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या फक्त नावानेच अनेक वाहनं विकली जातात. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. आजही एखादा वाहन खरेदीदार खरेदी करताना टाटाच्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतो. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत कंपनी देखील माकेटमध्ये नवनवीन कार ऑफर करत असते.
आता टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत Tata Sierra पुन्हा लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी नोव्हेंबर 2025 मध्ये ही कार लाँच करण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच भारतीय रस्त्यांवर या कारची टेस्टिंग होताना दिसली आहे. 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्येही ती प्रदर्शित करण्यात आली होती. टाटा सिएरा बाजारात कोणती खास फीचर्स आणणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
काय लूक आहे राव! नवीन Honda CB1000F सादर, परफॉर्मन्स दमदार अन् किंमत वाचून व्हाल गार
नवीन टाटा सिएरामध्ये मॉडर्न आणि प्रीमियम लूक असेल, त्याचबरोबर याचे लेजेंडरी डिझाइनही कायम राहील. एसयूव्हीमध्ये बॉक्सी प्रोफाइल, रुंद बी-पिलर आणि अल्पाइन विंडो डिझाइनसारखे क्लासिक एलिमेंट कायम राहतील. मात्र, आता ही नवीन मोनोकोक प्लॅटफॉर्मवर आधारित 5-दरवाज्यांची एसयूव्ही असेल.
पुढच्या भागात शार्प एलईडी डीआरएल, सिएरा लेटरिंग आणि मजबूत बंपर डिझाइनसह पूर्ण-रुंदीची एलईडी स्ट्रिप असेल. साइड प्रोफाइलमध्ये फ्लश डोअर हँडल, स्क्वेअर व्हील आर्च आणि हेवी बॉडी क्लॅडिंग असेल. एसयूव्हीच्या मागील भागात कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, सिएरा बॅजिंग आणि स्टायलिश बंपर डिझाइन असेल.
नवीन सिएरा चे इंटीरियर प्रीमियम असेल, ज्यामध्ये ट्रिपल-स्क्रीन लेआउट शक्य आहे. हे इंटिरियर टाटा कारसाठी पहिले असेल. त्यात प्रकाशित टाटा लोगोसह 4-स्पोक स्टीअरिंग व्हील असेल.
यामध्ये व्हेंटिलेटेड आणि पॉवर्ड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, अँबियंट लाइटिंग, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, प्रीमियम साउंड सिस्टम आणि ओटीए (ओव्हर-द-एअर) अपडेट्स यासह अनेक उत्तम फीचर्स असतील.
कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, त्यात लेव्हल-2 एडीएएस फीचर्स, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड/डिसेंट कंट्रोल, ईएसपी आणि 360° कॅमेरा सिस्टम यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. या सेफ्टी फीचर्समुळे, भारत एनसीएपी / ग्लोबल एनसीएपीमध्ये याला 5-स्टार रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे.