Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन! उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध लेखकांच्या पुस्तकांशी झाली ओळख

जागतिक पुस्तक दिनानिमित्त भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देत वाचनाची गोडी वाढवण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध नामवंत लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देत वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या परिसरात आकर्षक पद्धतीने मांडणी केलेल्या पुस्तकांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.

परदेशी शिष्यवृत्तीत शाखानिहाय वाटपावर प्रश्नचिन्ह, अभियांत्रिकीला झुकते माप; इतर शाखेतील विद्यार्थ्यांची नाराजी

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विष्णू मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुस्तके ही माणसाला घडवणारी आणि संस्कार करणारी खरी साधने आहेत. पुस्तकांचे बाह्यरूप जितके महत्त्वाचे असते, तितकाच त्यातील मजकूर जीवनाला दिशा देणारा असतो. अनेकदा वाचताना एखादी गोष्ट क्षुल्लक वाटते, मात्र प्रत्यक्ष जीवनात तीच गोष्ट अनुभवताना तिचे खरे महत्त्व जाणवते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले जिवलग मित्र मानून उन्हाळी सुट्टीचा काळ वाचनात घालवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षिका ज्योती मोहिते यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, जसे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मूर्ती तयार करतो, तसेच पुस्तके आपल्या आयुष्याला योग्य आकार देतात. वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये व्यापकता येते आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. पुस्तके केवळ ज्ञान देत नाहीत, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याचे कामही करतात, असे त्यांनी नमूद केले.

पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील कथा, कादंबऱ्या, चरित्रे, विज्ञान, इतिहास आणि प्रेरणादायी साहित्याची मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या पुस्तकांचे अवलोकन केले तसेच काही विद्यार्थ्यांनी आवडलेल्या पुस्तकांची नोंद करून भविष्यात वाचण्याची इच्छा व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची उत्सुकता वाढल्याचे शिक्षकांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी ज्ञान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेकडून अशा उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Washim News : साईबाबा विद्यालयात पक्ष्यांसाठी जलपात्र! अशा उपक्रमांची गरज अधिक अधोरेखित

दरम्यान, या पुस्तक प्रदर्शन उपक्रमाचे पालक व स्थानिक नागरिकांनीही स्वागत केले आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत असताना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजून घेण्यास मदत होत आहे. ज्ञान विकास विद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरत असून, इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Book exhibition on the occasion of world book day in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Career
  • Chhatrapati Sambhaji Maharaj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.