Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य

Bunker Roy News : निरक्षर ग्रामीण महिलांना सौरऊर्जा अभियंता बनवून आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारे बंकर रॉय यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. बेअरफूट कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी भारतासह जगभरातील महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 11, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मोठे शिक्षण सोडून ग्रामीण भारताचा स्वीकार
  • निरक्षर महिलांना दिले सौरऊर्जा अभियंता बनण्याचे प्रशिक्षण
  • भारतापुरता मर्यदित न राहता जगभर पोहोचला प्रयोग
Bunker Roy News : शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान आणि मोठ्या पदव्या नव्हेत ,तर योग्य संधी मिळाल्यास सामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो , हे भारतातील एका व्यक्तीने जगाला दाखवून दिले .त्यांचे नाव आहे बंकर रॉय ( Bunker Roy ) राजस्थानमधील दुर्गम गावातील निरक्षर महिलांना सौरऊर्जा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांनी त्यांना अभियंता बनवले .विशेष म्हणजे ,या महिलांनी केवळ स्वतःचे आयुष्य बदलले नाही . तर जगभरातील अनेक दुर्गम गावांमध्ये अंधार दूर करण्याचे काम केले .

मोठे शिक्षण सोडून ग्रामीण भारताचा स्वीकार

बंकर रॉय यांचा जन्म १९४५ मध्ये झाला . उच्चभ्रू कुटुंबात वाढलेल्या बंकर रॉय यांनी प्रतिष्ठित शिक्षण घेतले होते . मात्र १९६० च्या दशकात बिहारमधील दुष्काळग्रस्त भागात काम करताना त्यांना ग्रामीण भारतातील गरिबी आणि सामाजिक विषमतेची जाणीव झाली . त्यानंतर त्यांनी पारंपरिक करिअरचा मार्ग सोडून ग्रामीण समुदायांपासून काम करण्याचा निर्णय घेतला . १९७२ मध्ये राजस्थानमधील तिलोनिया येथे त्यांनी सामाजिक विकासाच्या कामाला सुरवात केली . पुढे याच कामातून बेअरफूट कॉलेजची स्थापना झाली .

राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती

निरक्षर महिलांना दिले सौरऊर्जा अभियंता बनण्याचे प्रशिक्षण

बंकर रॉय यांच्या कामातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे ग्रामीण महिलांना तांत्रिक ज्ञान देण्याची संकल्पना .त्यांनी अशा महिलांची निवड केली . ज्यांना अनेकदा शाळेत जाण्याची संधीही मिळाली नव्हती . या महिलांना सौर पॅनेल बसवणे , बॅटरी जोडणे , दिवे दुरुस्त करणे आणि सौरऊर्जा यंत्रणा सांभाळणे याचे प्रशिक्षण देण्यात आले . या महिलांना सोलर मामा (Solar Mamas ) म्हणून ओळखले जाऊ लागले . भाषेची अडचण आणि औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही त्यांनी प्रत्यक्ष कामातून तांत्रिक कौशल्य आत्मसात केले . त्यामुळे गावांमध्ये वीजपुरवठयासाठी बाहेरील तज्ञांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली .

Board Exam 2027: 12वीच्या अकाउंटन्सी परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाची CBSE आणि केंद्र सरकारला नोटीस

भारतापुरता मर्यदित न राहता जगभर पोहोचला प्रयोग

तिलोनिया येथील हा प्रयोग पुढे आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचला .आफ्रिका , आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील दुर्गम भागांमधील महिलांनीही बेअरफूट कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतले . प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या महिला आपल्या गावात परतल्या आणि सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासह त्यांच्या देखभालीची जबादारी सांभाळू लागल्या . बंकर रॉय यांच्या या कार्यक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली .

१९८६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . २०१० मध्ये टाइम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांच्या समावेश केला . मात्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी आयुष्यभर काम करणारा एक दूरदृष्टीचा समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला . त्यांचे कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे .

 

 

Web Title: Bunker roy women engineers cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Marathi News
  • Rural Development
  • woman

संबंधित बातम्या

Indian Scientists: मर्यादित संसाधनांतून रचला इतिहास! जाणून घ्या भारतीय अंतराळ आणि अणुऊर्जेच्या ५ जनकांविषयी सविस्तर
1

Indian Scientists: मर्यादित संसाधनांतून रचला इतिहास! जाणून घ्या भारतीय अंतराळ आणि अणुऊर्जेच्या ५ जनकांविषयी सविस्तर

Pearl Stone Benefits: मनःशांतीपासून सौभाग्यापर्यंत! मोती धारण करण्याचे 3 फायदे, पण नियम आहेत महत्त्वाचे
2

Pearl Stone Benefits: मनःशांतीपासून सौभाग्यापर्यंत! मोती धारण करण्याचे 3 फायदे, पण नियम आहेत महत्त्वाचे

Nvidia News : जेन्सेन हुआंग यांच्याभोवती गुप्तहेरगिरीचा संशय; एनव्हिडियाकडून स्वतंत्र चौकशी सुरू
3

Nvidia News : जेन्सेन हुआंग यांच्याभोवती गुप्तहेरगिरीचा संशय; एनव्हिडियाकडून स्वतंत्र चौकशी सुरू

Israel Breaking News : नेतन्याहूंची सत्ता उलथवण्याची तयारी; आयझेनकोट यांच्यासमोर सरकार स्थापनेचे आव्हान
4

Israel Breaking News : नेतन्याहूंची सत्ता उलथवण्याची तयारी; आयझेनकोट यांच्यासमोर सरकार स्थापनेचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.