
survey
Cambridge survey 2025 India students : सध्याच्या काळात अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याला प्राधान्य देत असल्याचे मानले जाते, मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालाने हा समज काहीसा बदलला आहे. परदेशात जाऊन पदवी घेण्याऐवजी भारतातच अंडरग्रॅजुएट (UG) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ‘कॅब्रिज डेस्टिनेशन सर्व्हे २०२५-२६’ नुसार, २०२५ मध्ये भारतातील जितके विद्यार्थी युनिव्हर्सिटीत जाण्याची तयारी करत होते, त्यापैकी तब्बल अर्ध्या विद्यार्थ्यांनी देशातच राहून अंडरग्रॅजुएट शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे. २०२४ मध्ये हे प्रमाण ४७ टक्के होते, तर परदेशात UG करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून घसरून ४० टक्क्यांवर आले आहे.
‘कॅब्रिज इंटरनॅशनल एज्युकेशन’च्या या सर्वेक्षणात ४९ देशांमधील ४०४ शाळांचा समावेश करण्यात आला होता आणि यादरम्यान सुमारे २४,६३७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले. यामध्ये भारतातील ११२ शाळांनी सहभाग घेतला होता.
देशातच राहण्याचा बदलता कल: तज्ञांच्या मते, हा केवळ एका वर्षाचा बदल नसून एक मोठा स्ट्रक्चरल शिफ्ट (संरचनात्मक बदल) आहे. विद्यार्थी आता केवळ पदवीची किंमत पाहत नाहीत, तर शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहेत.
AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये
आधी भारतात, नंतर परदेशात मास्टर्स: अनेक भारतीय कुटुंबे परदेशात शिकण्याचा पर्याय पूर्णपणे टाळत नसून तो पुढे ढकलत आहेत. विद्यार्थी भारतातून ग्रॅजुएशन पूर्ण करून पुढील मास्टर्सच्या शिक्षणासाठी परदेशात जाणे पसंत करत आहेत.
भारतीय विद्यापीठे आता केवळ आर्थिक कारणांमुळे किंवा प्रवेश न मिळाल्यामुळे निवडली जाणारी पर्याय राहिलेली नाहीत, तर अनेक विद्यार्थी त्यांना आपली पहिली पसंती मानत आहेत. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये होणारे सकारात्मक बदल, दर्जेदार खाजगी व आंतरविद्याशाखीय संस्था आणि विदेशी विद्यापीठांचे देशातील ब्रांच कॅम्पस यामुळे विद्यार्थ्यांसाठी देशातच शिकणे सोपे झाले आहे.
मल्टी-डिसीप्लिनरी कोर्सेसची उपलब्धता: डेटा सायन्स, बिजनेस अनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या आधुनिक विषयांचे पर्याय आता देशातच उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज भासत नाहीये.