Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Imran Khan Education: बॉलीवूड अभिनेता इम्रान खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर एका निषेध आंदोलनात सहभागी झाल्यानंतर चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या शिक्षणाचा आढावा जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 15, 2026 | 04:45 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Imran Khan Education: बॉलीवूड अभिनेता इम्रान खान सध्या त्याच्या चित्रपटांमुळे नाही, तर एका निषेध आंदोलनात सहभागी झाल्यानंतर चर्चेत आला आहे. अभिनेता आमिर खानचा भाचा असलेल्या इम्रान खानला मुंबई पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इम्रान अमेरिकन नागरिक असून भारतात ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डधारक म्हणून राहतात. त्यामुळे या प्रकरणाने त्यांच्या नागरिकत्वाचा दर्जा आणि परदेशी नागरिकांच्या राजकीय आंदोलनांमध्ये सहभागी होण्याबाबतच्या नियमांवरही चर्चा सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या शिक्षणाचा आपण आढावा घेणार आहोत?

कोणी आहेत इम्रान खान?

इम्रान खान हे हिंदी चित्रपटांचे अभिनेते आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९८३ रोजी अमेरिकेतील मॅडिसन येथे झाला. ते अभिनेता आमिर खानचे भाचे आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मन्सूर खान यांचे पुतणे आहेत. त्यांचे मामा नासिर हुसेन हे देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राहिले आहेत. इम्रानने लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

इम्रान खानचे शिक्षण नेमके किती झाले आहे?

इम्रान खान यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूच्या कुन्नूर येथील ब्लू माउंटेन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी उटीच्या एका गुरुकुलमध्येही काही काळ घालवला. नंतर ते अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या सनीवेल येथे आपल्या वडिलांकडे गेले आणि तिथे फ्रेमोंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

इम्रानला अभिनयासोबतच चित्रपट निर्मितीमध्येही रस होता. याच कारणामुळे त्यांनी लॉस एंजेलिसस्थित न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईच्या किशोर नमित कपूर अभिनय इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. अशा प्रकारे त्यांचे शिक्षण भारत आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी झाले.

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

१० ऑक्टोबर रोजी मुंबईत काय घडले होते?

इम्रान खान यांना भारत सोडण्याची नोटीस मिळण्याचे कारण १० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झालेले आंदोलन हे आहे. हे आंदोलन ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) समथर्नासाठी आयोजित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांची होती. या मागणीमागे मतदारयाद्यांच्या विशेष कसूर पुनरीक्षण म्हणजेच ‘एसआयआर’ (SIR) बाबत कथित अनियमिततेचे आरोप होते.

आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे होते. बॉम्बे हायकोर्टाच्या निर्देशानुसार आंदोलनासाठी आझाद मैदान ठरवून देण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे, CJP शी संबंधित लोकांनी असा दावा केला की त्यांनी पोलिसांकडे ईमेलद्वारे परवानगी मागितली होती, परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही. या दरम्यान ४०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली होती. ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये इम्रान खान यांचाही समावेश होता.

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

भारत सोडण्याची नोटीस का देण्यात आली?

या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांनी इम्रान खान यांच्या अमेरिकन नागरिकत्वाचा आणि OCI कार्डचा हवाला देत असा सवाल उपस्थित केला होता की, एखादा परदेशी नागरिक राजकीय आंदोलनात कसा सहभागी होऊ शकतो? त्यांनी अभिनेत्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

त्यानंतर (आज) १५ ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी इम्रान खान यांना २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक नसतानाही राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी त्यांच्यावर इमिग्रेशन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस का बजावण्यात आली आहे?

    Ans: अमेरिकन नागरिक आणि OCI कार्डधारक असूनही मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे पोलिसांकडून इमिग्रेशन कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Que: इम्रान खानला कधीपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत?

    Ans: मुंबई पोलिसांनी इम्रान खानला २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे.

Web Title: Imran khan education notice leave india oci card august kranti maidan protest sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Career
  • education
  • Imran khan

संबंधित बातम्या

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या
1

Top IIIT Colleges : भारतातील ‘या’ ५ टॉप IIIT महाविद्यालयांमध्ये कसा मिळवाल प्रवेश? जाणून घ्या

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?
2

Jailer 2 Fame Rajinikanth Education: १० वीत नापास ते CBSE च्या पुस्तकातील धडा! ‘Jailer 2’ फेम सुपरस्टार रजनीकांत किती शिकलेत?

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
3

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.