Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career mistakes after 12th: १२ वी नंतर ‘या’ ५ चुका केल्यास करिअर होईल उद्ध्वस्त; कॉलेजमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी एकदा वाचा!

Career mistakes after 12th: 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थी करिअरमध्ये कोणत्या चुका करतात? डिग्रीसोबत स्किल्स, नेटवर्किंग आणि टाईम मॅनेजमेंटचे महत्त्व जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 13, 2026 | 11:12 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Career mistakes after 12th: शालेय शिक्षण पूर्ण करणे म्हणजे आयुष्यातील एक टप्पा संपण्यासारखा असतो. शाळेच्या कडक शिस्तीतून बाहेर पडून कॉलेजच्या रंगतदार दुनियेत पाऊल ठेवताच तरुण वर्ग स्वतःला पूर्णपणे मोकळा आणि स्वतंत्र अनुभवतो. या नवीन प्रवासाची सुरुवात करताना मनात खूप मोठे स्वप्न असतात – कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला इंजिनिअर तर कोणाला कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालायचा असतो. परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास अनेक विद्यार्थी नकळत अशा काही चुका करून बसतात, ज्यांचा फटका त्यांना आयुष्यभर सहन करावा लागतो.

सध्याच्या काळात केवळ कॉलेजची डिग्री मिळवणे म्हणजे आवडीची नोकरी मिळण्याची कोणतीही खात्री नाही. कंपन्या आता केवळ पुस्तकी ज्ञान पाहत नाहीत, तर त्या प्रॅक्टिकल स्किल्स (व्यावहारिक कौशल्ये), अनुभव आणि योग्य दृष्टिकोन शोधतात. बऱ्याचदा विद्यार्थी कॉलेजची पहिली काही वर्षे फक्त मौजमजेत किंवा कोणतीही दिशा न ठरवता घालवतात. जेव्हा हातात डिग्री येते, तेव्हा त्यांना जाणीव होते की जॉब मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये त्यांच्याकडे आहेतच नाहीत. १२ वी नंतर कोणत्या ५ चुका केल्याने करिअर उद्ध्वस्त होऊ शकते, हे आपण सविस्तर पाहूया.

१२ वी नंतर ‘या’ चुका केल्यास करिअर होईल उद्ध्वस्त

मजबूत करिअरची पायाभरणी शालेय जीवनापासूनच सुरू होते. १२ वी नंतर खालील ५ चुका करणे टाळा, अन्यथा तुमचे करिअर धोक्यात येऊ शकते. मनपसंद नोकरी मिळवण्यासाठी शालेय जीवन संपताच काही विशिष्ट कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे असते:

१. केवळ डिग्रीच्या भरवशावर बसणे आणि स्किल्स न वाढवणे:

ही चूक बहुतांश विद्यार्थी करतात. त्यांना वाटते की हातात डिग्री मिळताच कंपन्या स्वतःहून त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज देऊ लागतील. परंतु, वास्तविकता याच्या अगदी उलट आहे. आजचे कॉर्पोरेट जग केवळ कौशल्ये (Skills) पाहते. जर तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कोडिंग, कम्युनिकेशन किंवा डिजिटल स्किल्स शिकला नाही, तर ती डिग्री केवळ भिंतीवर सजवण्यासाठीच कामी येईल. त्यामुळे कॉलेजच्या अभ्यासासोबतच ऑनलाइन कोर्सेस, इंटर्नशिप्स आणि प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून तुमची स्किल्स सातत्याने अपग्रेड करत राहा.

२. गर्दीचा भाग बनणे आणि आवडीशिवाय करिअर निवडणे:

अनेकदा विद्यार्थी पाहतात की त्यांचे मित्र किंवा शेजारी कोणत्या कोर्सला प्रवेश घेत आहेत. त्यानंतर ते कोणतीही विचारपूस न करता त्याच गर्दीत सामील होतात. कोणी इंजिनिअरिंगला जाते तर कोणी बीसीए किंवा बीबीए निवडते, मग त्यात त्यांची आवड असो वा नसो. जेव्हा तुम्ही आवडीशिवाय किंवा पॅशनशिवाय एखादा मार्ग निवडता, तेव्हा काही काळानंतर ती अभ्यासक्रमाची गोष्ट एक ओझे वाटू लागते आणि तुम्ही तुमचे १००% देऊ शकत नाही. स्वतःची क्षमता, आवड आणि भविष्यातील मागणी ओळखूनच करिअरचा मार्ग निवडा, अन्यथा अपूर्ण आवडीमुळे तुम्ही कधीही त्या क्षेत्रात तज्ज्ञ बनू शकणार नाही.

How to Get Job in Google: IIT ची डिग्री नसतानाही कशी मिळवली गुगलमध्ये नोकरी? जाणून घ्या समृद्धी शर्माचा गुगलपर्यंतचा प्रवास

३. नेटवर्किंग आणि इंटर्नशिपला दुर्लक्षित करणे:

कॉलेजच्या सुरुवातीच्या वर्षांत अनेक विद्यार्थ्यांना वाटते की अभ्यासासाठी अजून खूप वेळ आहे. ते इंटर्नशिप किंवा नेटवर्किंग शेवच्या वर्षापर्यंत ढकलत राहतात. ही एक खूप मोठी चूक ठरते. आजच्या काळात चांगल्या नोकऱ्या लिंक्डइन नेटवर्किंग आणि रेफरन्सच्या माध्यमातून मिळतात. जर तुम्ही कॉलेजच्या काळात प्रोफेशनल लोकांशी जोडले गेला नाहीत, सेमिनार्स अटेंड केले नाहीत आणि इंटर्नशिपमधून इंडस्ट्रीचा अनुभव घेतला नाही, तर डिग्री मिळाल्यानंतर फ्रेशर म्हणूनही तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. अनुभव नेहमी पुस्तकी ज्ञानापेक्षा वरचढ ठरतो.

४. टाईम मॅनेजमेंट न करणे आणि अपयशाला घाबरणे:

शाळा आणि कॉलेजच्या आयुष्यात जमीन-आसमानाचा फरक असतो. शाळेत शिक्षक प्रत्येक गोष्टीची सतत आठवण करून देतात, पण कॉलेजमध्ये स्वतःचे अनुशासन स्वतःलाच ठरवावे लागते. अनेक तरुण आपला जास्तीचा वेळ सोशल मीडियावर रील्स पाहण्यात किंवा निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया घालवतात. याशिवाय, छोटी-मोठी अपयशे आल्यावर किंवा कोडिंग करताना एरर आल्यास ते घाबरून जातात.

सातत्य (Consistency) आणि वेळेचे व्यवस्थापन हेच यशाची खरी किल्ली आहे. दररोज थोडे-थोडे शिकणे आणि स्वतःला सुधारणे हेच तुम्हाला गर्दीतून वेगळे उभे करते.

Anmol Sher Singh Bedi IFS: ‘परमाणू धमकीसमोर भारत झुकणार नाही!’ UN च्या मंचावरून पाकिस्तानवर धडकणारे अनमोल बेदी नेमके कोण?

५. कम्युनिकेशन स्किल्स आणि पर्सनॅलिटीवर काम न करणे:

तुम्ही कितीही मोठे टेक्निकल एक्सपर्ट असाल, पण मुलाखतीत (इंटरव्यू) तुमची मते समोरच्या व्यक्तीसमोर योग्य प्रकारे मांडता आली नाहीत, तर तुमचे संपूर्ण ज्ञान वाया जाईल. बहुतांश विद्यार्थी इंग्रजी, बॉडी लँग्वेज किंवा बोलण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यावर भर देत नाहीत. कॉर्पोरेट जगतात टीमवर्क आणि क्लायंट हँडलिंगसाठी उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे कॉलेजच्या दिवसांपासूनच स्वतःच्या पर्सनॅलिटीला आकार देण्यास सुरुवात करा, पब्लिक स्पीकिंगमध्ये सहभाग घ्या आणि स्वतःला एक कॉन्फिडेंट प्रोफेशनल बनवा.

Web Title: Career mistakes after 12th students must avoid marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Career
  • Collapse

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.