Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

CAT 2026 Preparation with AI: कॅट २०२६ ची तयारी करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून अभ्यासामधील अचूकता कशी वाढवता येईल आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 31, 2026 | 04:54 PM
cat

cat

Follow Us
Follow Us:

CAT 2026 Preparation with AI: कॉमन अडमिशन टेस्ट (CAT) ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. IIM आणि देशातील टॉप बी-स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कॅट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कॅटच्या तयारीसाठी आता केवळ कोचिंग क्लासेस किंवा तासनतास पुस्तके चाळण्याचा पॅटर्न मागे पडला असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने संपूर्ण तयारीचे चित्र बदलून टाकले आहे. आता कमकुवत बाजू ओळखण्यासाठी महिनोन्महिने मॉक टेस्टच्या निकालाची वाट पाहावी लागत नाही, कारण एआय टूल्स सेकंद्‌समध्ये तयारीचा सर्व लेखाजोखा समोर ठेवतात.

कॅट २०२६ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एआय एका पर्सनल मेंटरप्रमाणे काम करत आहे. हे केवळ स्पीड आणि अचूकता वाढवत नाही, तर अभ्यासाची कंटाळवाणी पद्धतही बदलत आहे. मात्र, केवळ चॅटजीपीटीला प्रश्न विचारणे म्हणजे एआयचा वापर नव्हे. कॅट परीक्षा क्रॅक करण्यासाठी एआयचा योग्य, स्मार्ट आणि स्ट्रक्चर्ड वापर कसा करावा, हे जाणून घेऊया.

VARC सेक्शनसाठी एआय बनले ‘पर्सनल ट्यूटर’

कॅटच्या वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेंशन सेक्शनला अनेक उमेदवार घाबरतात. एआयच्या मदतीने तुम्ही मोठे आणि कठीण रीडिंग कॉम्प्रिहेंशन झटपट समजावून घेऊ शकता.

कस्टम आरसी जनरेटर: तुम्ही एआयद्वारे एथिक्स, फिलॉसफी किंवा इकॉनॉमिक्ससारख्या कठीण विषयांवर कॅट-लेव्हलचे पॅसेज तयार करून घेऊ शकता.

व्होकॅब आणि टोन अनालिसिस: पॅसेज कॉपी-पेस्ट करून एआयला ऑथरची ‘टोन’ आणि कठीण शब्दांचे संदर्भासहित अर्थ विचारू शकता. यामुळे एलिमिनेशन टेक्निक्स मजबूत होतात.

DILR मध्ये कोडे सोडवणे झाले सोपे

डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रीजनिंग (DILR) मध्ये कोडे समजून घेण्यात सर्वात जास्त वेळ जातो.

स्टेप-बाय-स्टेप लॉजिक ब्रेकडाउन: जर तुम्ही एखाद्या DILR सेटमध्ये अडकलात, तर एआयला सरळ उत्तर विचारण्याऐवजी सांगा: “मला थेट उत्तर देऊ नका, फक्त हिंट द्या आणि पुढील स्टेपसाठी गाईड करा.”

नवीन सेट तयार करणे: एआयला जुन्या कॅट DILR सेट्सचा पॅटर्न देऊन त्याच धर्तीवर नवीन प्रॅक्टिस सेट्स तयार करण्यास सांगू शकता.

Quant मध्ये अचूकता आणि शॉर्टकट ट्रिक्सचा हैक

क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये सूत्रे पाठ करण्यापेक्षा त्यांचा वापर कसा करायचा हे महत्त्वाचे असते.

कमकुवत घटकांवर प्रहार: जर तुमचे अलजेब्रा किंवा जिऑमेट्री कमजोर असेल, तर एआयला सांगा: “मला अलजेब्राचे असे ५ प्रश्न द्या, जे कॅटच्या गेल्या ५ वर्षांच्या ट्रेंडवर आधारित असतील आणि त्यांची काठिण्य पातळी ३ असेल.”

मल्टिपल अप्रोच शिका: एखादा प्रश्न पारंपरिक पद्धतीने, ऑप्शन एलिमिनेशन किंवा एलिगेशन ट्रिकने कसा सोडवावा, हे एआयकडून शिका.

NEET UG Counselling राउंड १ चे सीट अलॉटमेंट जाहीर; किती जागांवर झाले प्रवेश आणि कट ऑफ किती राहिला?

कोचिंगही शिकवणार नाही असे मॉक अनालिसिस

मॉक टेस्ट देणे सोपे आहे, पण त्याचे विश्लेषण करणे सर्वात कंटाळवाणे आणि कठीण काम असते. येथे एआय गेमचेंजर ठरू शकते. तुम्ही तुमचा मॉक स्कोरकार्ड आणि टाईम-स्पेंड डेटा एआयवर अपलोड करू शकता. कोणत्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमचा वेळ वाया गेला आणि अचूकता कुठे कमी झाली, हे एआय अचूक डेटासह सांगू शकते. तसेच कोणते प्रश्न सोडवायचे होते आणि कोणते सोडायचे होते, याचे मार्गदर्शनही ते करते.

मुंबईतील AIIPMR मध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; स्पेशालिस्ट पदांसाठी अशी केली जाईल निवड!

एआय वापरताना करू नका या चूका

हॅलुसिनेशनचा शिकार होऊ नका: एआय अनेकदा गणिताचे कॅल्क्युलेशन चुकीचे करू शकते. त्यामुळे फॉर्म्युले आणि लॉजिक नेहमी री-चेक करा.

विचार करण्याची क्षमता गमावू नका: DILR मध्ये लगेच एआयची मदत घेऊ नका. किमान १५-२० मिनिटे स्वतः डोके लावा, अन्यथा परीक्षा हॉलमध्ये अडचणी येऊ शकतात.

आऊटडेटेड डेटा: एआय कडून जेव्हाही प्रॅक्टिस सेट बनवून घ्याल, तेव्हा त्याला कॅटचा लेटेस्ट परीक्षा पॅटर्न आवर्जून समजून घ्या.

Web Title: Cat 2026 preparation using artificial intelligence tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • ai
  • education
  • Entrance exam

संबंधित बातम्या

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
1

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Anand Kumar News: ‘सुपर ३०’ चा आनंद कुमार जपानमध्ये चर्चेत; पण काय नेमकं कारण? जाणून घ्या
2

Anand Kumar News: ‘सुपर ३०’ चा आनंद कुमार जपानमध्ये चर्चेत; पण काय नेमकं कारण? जाणून घ्या

DY Patil Pune: पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ ३ वैज्ञानिकांनी जागतिक पातळीवर मिळवले स्थान
3

DY Patil Pune: पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ ३ वैज्ञानिकांनी जागतिक पातळीवर मिळवले स्थान

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा
4

India’s High Paying Jobs: नोकरी शोधताय? ‘या’ क्षेत्रात आहे बक्कळ पैसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.