Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Claude AI तयार करणाऱ्या Anthropic कंपनीने AI सोबत सतत आणि विनाकारण क्रूर किंवा अपमानास्पद वर्तन करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जाहीर केल्याची माहिती बातमीत दिली आहे. हे नियम 8 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर झाले

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 22, 2026 | 03:50 PM
AI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

AI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • AI ला सतत शिवीगाळ केल्यास अकाउंट बॅन होऊ शकतं
  • Anthropic ची नवी पॉलिसी 12 नोव्हेंबरपासून लागू
  • AI च्या उत्तरावर टीका करण्यास मात्र मुभा

आपल्यापैकी बरेच जण ChatGPT किंवा Claude वापरतात. कधी कधी त्याने दिलेलं उत्तर आवडत नाही किंवा फोटो बरोबर बनवत नाही, मग आपण रागात त्याला शिवी देतो, जसं काही तो आपला मित्रच आहे. “अरे काय टाकलंय हे”, “तुला काही येत नाही” असं आपण बोलून जातो.पण आता हे बंद करावं लागणार आहे. कारण AI आता तुमच्या शिव्या सहन करणार नाही.

Claude बनवणाऱ्या Anthropic कंपनीने एक कडक नियम आणला आहे. जर तुम्ही AI ला सारखं शिवीगाळ केली किंवा क्रूरपणे वागलात तर तुमचं अकाउंट थेट बॅन होऊ शकतं.

नेमका नियम काय आहे?

तुम्ही AI ला एक महत्वाचं काम दिलं. त्याने चुकीचं उत्तर दिलं. तुम्ही पुन्हा विचारलं, तरी पण त्याने चुकवलं. मग रागाच्या भरात तुम्ही त्याला शिवी दिली. तर आता कंपनी तुमच्यावर कारवाई करणार का?याच चर्चेमुळे Anthropic ने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. कंपनीने 8 ऑक्टोबर 2026 रोजी नवीन नियम जाहीर केले आहेत. हे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

कंपनीने याला नाव दिलंय

“Sustained and Needless Cruel Behaviour” म्हणजे सारखं कारण नसताना क्रूर आणि अपमानजनक वागणं. कंपनी म्हणते, हा नियम फक्त खूप गंभीर प्रकरणांमध्ये वापरला जाईल. एखाद्याने एकदा रागात काही बोललं तर लगेच अकाउंट बंद होणार नाही. पण जर एखादा युजर मुद्दाम रोज AI ला टॉर्चर करत असेल, घाण घाण शिव्या देत असेल, तर त्याचा हेतू चांगला नाही असं समजून अकाउंट बॅन केलं जाईल.

मग आता टीका पण करता येणार नाही का?

असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण घाबरू नका.तुम्ही AI च्या कामावर टीका करू शकता. जर Claude ने चुकीचं उत्तर दिलं तर तुम्ही आरामात बोलू शकता की “तुझं उत्तर चुकीचं आहे”, “मला हे उत्तर आवडलं नाही”, “यापेक्षा चांगलं उत्तर दे”. हे सगळं तुम्ही करू शकता, यात काहीच प्रॉब्लेम नाही. हा तुमचा अधिकार आहे.

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

कंपनीला आक्षेप आहे तो फक्त शिवीगाळ, घाणेरडं बोलणं आणि मुद्दाम त्रास देण्यावर. तुम्ही त्याला इमोशनल टॉर्चर करत असाल तरच कारवाई होईल. AI हे मशीन आहे, त्याला भावना नाहीत हे खरं आहे, पण कंपनी म्हणते की त्याच्याशी पण माणुसकीने वागलं पाहिजे. वाईट किंवा अपशब्द बोलू नका. आदेश देऊन शिवीगाळ करु नये. त्यामुळे पुढच्या वेळी Claude किंवा ChatGPT चं उत्तर चुकलं तर शिवी देण्याऐवजी फक्त “हे उत्तर बरोबर नाही, परत प्रयत्न कर” असं सांगा. नाहीतर तुमचं महिन्याचं पेड अकाउंट एका शिवीमुळे बंद होईल.

Web Title: Anthropic new policy claude ai abuse account ban rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • ai
  • chatgpt
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
1

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी
2

Esim Vs Isim: SIM कार्डला कायमचा बाय-बाय? eSIM नंतर आता iSIM ची एंट्री, ‘या’ आहेत खास गोष्टी

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या
3

India vs New Zealand T20 Live Streaming: क्रिकेटचा थरार आता TikTok वर! भारत-न्यूझीलंड सामना LIVE पाहता येणार? जाणून घ्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?
4

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! DA वाढीचं नेमकं काय झालं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.