Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

CBSE 10th Result 2026 Update: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला होत असलेल्या उशिरामुळे ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे अडथळे येत आहेत. निकाल कधी जाहीर होणार आणि विद्यार्थ्यांना कोणत्या ३ मुख्य समस्या भेडसावत आहेत? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 09:10 AM
CBSE

CBSE

Follow Us
Follow Us:

CBSE 10th Result 2026 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी यंदापासून एक मोठा बदल केला आहे. आता १० वीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून २ वेळा आयोजित केल्या जात आहेत. या नवीन नियमांतर्गत, पहिल्या मुख्य परीक्षेचा निकाल १५ एप्रिल २०२६ रोजीच जाहीर करण्यात आला होता. जे विद्यार्थी आपल्या गुणांवर समाधानी नव्हते किंवा काही कारणास्तव चांगली कामगिरी करू इच्छित होते, त्यांच्यासाठी १५ मे ते ३१ मे २०२६ दरम्यान दुसरी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

देशभरातून ६.८ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सीबीएसई १० वीची दुसरी बोर्ड परीक्षा दिली होती. परीक्षा संपून आता बराच काळ झाला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रतीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. निकाल जाहीर न झाल्याने याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांच्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission) बसत आहे. आपल्याला पुढे कोणती शाखा (Stream) मिळेल आणि आपण नवीन सत्राचा अभ्यास कधी सुरू करू शकू, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.

प्रवेश प्रक्रियेत उशीर: विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत ‘या’ ३ मोठ्या समस्या

१. शाखेची निवड (Stream Selection):

पहिली मुख्य समस्या शाखेच्या निवडीबाबत आहे. ११ वीमध्ये सायन्स (विज्ञान), कॉमर्स (वाणिज्य) किंवा आर्ट्स (कला) शाखेत प्रवेश घेण्यासाठी १० वीचे गुण खूप महत्त्वाचे ठरतात. जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना पुढे काय शिकायचे हे ठरवता येत नाहीये.

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!

२. शाळा बदलण्यात अडचण:

दुसरी अडचण त्या विद्यार्थ्यांना येत आहे, ज्यांना आपली शाळा बदलायची आहे. अनेक नामांकित शाळा अंतिम गुणपत्रिकेशिवाय (Final Marksheet) नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत.

३. अभ्यासाचे नुकसान:

तिसरी मोठी महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच तात्पुरता प्रवेश (Provisional Admission) घेतला आहे, त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे ते अर्धवट तयारीसह वर्गात बसत आहेत.

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!

सूत्रांच्या आणि मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे (कॉप्या तपासण्याचे) काम जवळपास पूर्ण केले आहे. या वर्षी ६.८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई १० वीची दुसरी बोर्ड परीक्षा दिली होती, त्यामुळे डेटा संकलित करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. जुलैच्या मध्यापर्यंत किंवा शेवटच्या आठवड्यापर्यंत बोर्ड कोणत्याही परिस्थितीत निकाल घोषित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही आणि शाळा देखील आपली प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकतील.

Web Title: Cbse 10th result 2026 delay 11th admission stream selection problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • 10th
  • 10th Board Exam
  • Admission Process
  • CBSC Exam
  • CBSE

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.