
CBSE 12th Compartment 2026
CBSE 12th Result 2026: सीबीएसई (CBSE) १२वीचा निकाल अखेर जाहीर झाला असून लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. निकालानंतर काही विद्यार्थी आनंदित तर काही विद्यार्थी कमी गुणांमुळे थोडे चिंतेत दिसत आहेत. तसेच यावेळी बोर्डाच्या उत्तरपत्रिका या सीबीएसीईने डिजिटल पद्धतीने तपासल्या आहेत. त्यामुळे निकाल अत्यंत पारदर्शक आणि अचूक असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे.
ज्या विद्यार्थ्यांला आपल्या अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत, असे वाटते. त्यांना आता घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. बोर्डाने पोस्ट रिझल्ट फॅसिलिटि सुरू केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी आपल्या गुणांच्या फेरपडताळणीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील. ही प्रक्रिया १८ एप्रिल २०२६ पासून सुरू होईल आणि त्यासाठी स्वतंत्र नोटीस जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच अर्ज करणे आवश्यक आहे. कारण अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार १२ वीची सप्लीमेंट्री (पुरवणी) परीक्षा १५ जुलै २०२६ रोजी आयोजित केली जाईल. या परीक्षेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
एकाच दिवसात परीक्षा: ही परीक्षा केवळ एकाच दिवसात घेतली जाणार आहे.
सुधारणेची संधी (Improvement): २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी केवळ एका विषयाची श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देऊ शकतील.
कंपार्टमेंट श्रेणी: २०२६ आणि २०२५ मध्ये कंपार्टमेंट श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसण्याची परवानगी असेल.
शेवटची संधी: २०२५ च्या कंपार्टमेंट विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल, कारण सीबीएसईकडून कंपार्टमेंट क्लियर करण्यासाठी एकूण तीन संधी दिल्या जातात.
CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
आपला निकाल सुधारण्यासाठी आणि शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ही एक सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.