फोटो सौजन्य - सोशल मीडिया
CBSE 12th Topper: ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन’चा (CBSE) १२ वीचा निकाल लागला की, दरवर्षी टॉपरची चर्चा होते. या वर्षी २०२६ च्या निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थी करत आहेत. पण याच दरम्यान सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या मार्कशीटने सर्वाचे लक्ष वेधून घतले आहे. चला तर मग जाणून घेऊया या वायरल मार्कशीटमागची संपूर्ण कहाणी…
सुरभी मित्तल जिने २०२४ च्या सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली होती. यंदा तीची मार्कशीट सोशल मीडियावर पुन्हा वायरल होत आहे. अमिटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडाच्या विद्यार्थीनीने ५०० पैकी ४९६ गुण मिळवले होते. जे ९९.२ टक्के इतके होते. या शानदार यशानंतर ती देशभरात चर्चेचा विषय बनली होती.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?
सुरभी मित्तलचे विषयानुसार गुणही थक्क करणारे आहेत. तिने इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण, राज्यशास्त्रात १०० गुण, मानसशास्त्रात ९९ गुण, अर्थशास्त्रात ९९ गुण तर गणितात ९८ गुण मिळवले होते. जवळपास प्रत्येक विषयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच चकित केले होते. तिच्या याच मार्कशीटचे पालक आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केल्यामुळे ही मार्कशीट सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.
अभ्यासात हुशार असणाऱ्या सुरभीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, तिला अर्थशास्त्र विषयात अधिक रस आहे. तसेच भविष्यात तिला यूपीएससीची परीक्षा पास करायची असून आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. तिच्या अभ्यासाचा उपयोग तिला समाजात बदल ऱघडवण्यासाठी करायचा आहे.
सुरभी केवळ अभ्यासातच नव्हे, तर आपल्या आवडीच्या गोष्टीमध्येही ती सक्रिय आहे. मोकळ्या वेळेत तिला गाणी ऐकणे, डान्स करणे, सायकलिंग करणे खूप आवडते हाच समतोल तिला अभ्यासातही मदत करतो. यशाचे रहस्य तिला विचारले असता तिने नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन(Time Management) आणि स्वत:वरचा विश्वास या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. सध्या तिची ही गोष्ट बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे.






