फोटो सौजन्य- सोशल मीडिया
नुकतीच डिजीलॉकर (DigiLocker) वर सीबीएसई निकालाबाबत मोठी अपडेट आली आहे. तिथे ‘CBSE Class 12th Result 2026 Coming soon’ असे लिहलेले दिसत आहे. याचाच अर्थ निकाल लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. अशा स्थितीत ज्या विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसई १२ वीची परीक्षा दिली आहे. त्यांनी आपल्या रोल नंबरचा तपशील तयार ठेवावा तसेच निकाल जाहीर होताच विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील.
निकाल जाहीर झाल्यानंतर सीबीएसई १२ वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी या स्टेप्स फॉलो करू शकतात.
स्टेप 1: सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर जावे.
स्टेप 2: विंडो उघडल्यानंतर होमपेजवर तुम्हाला ‘CBSE 12th Result 2026 Link’ दिसेल.
स्टेप 3: या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इतर विचारलेली माहिती भरून सबमिट करा.
स्टेप 4: तुमचे गुणपत्रक मार्कशीट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: तुम्ही याची पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवू शकता.






