Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता फक्त १०० रुपयांत पाहा तुमची उत्तरपत्रिका; पेपर पुनर्तपासणीची फी देखील केली कमी..

CBSE OSM System 2026 : सीबीएसईच्या ९८ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची डिजिटल तपासणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी १९ मे पासून अर्ज केल्यावर गुण वाढल्यास फी कशी परत मिळणार? जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 04:21 PM
cbse

cbse

Follow Us
Follow Us:
  • उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी पाहण्यास 100 रूपये फी
  • निकालांच्या पारदर्शकतेत वाढ
  • ९८ लाख ६६ हजार उत्तरपत्रिका तपासल्या स्कॅनिंगद्वारे
CBSE Board Exam Revaluation Fees: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी पाहण्यासाठी केवळ 100 रूपये फी द्यावी लागेल. जी यापूर्वी 700 रुपये होती. तसेच एखाद्या विशिष्ट प्रश्नांची पुनर्तपासणी (Revaluation) करण्यासाठी प्रतिप्रश्न केवळ 25 रुपये फी आकारली जाईल.

निकालांच्या पारदर्शकतेत वाढ

निकालांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गुणदानाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये असणाऱ्या चिंतेला दूर करण्यासाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. अलिकडच्या काळात पेपर तपासणी आणि गुण देण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Agniveer Salary :भारतीय सैन्यात अग्निवीरांना पगार आणि निवृत्तीनंतर ‘सेवा निधी’ पॅकेज किती मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

उत्तरपत्रिकाची केली डिजिटल तपासणी

यंदा बोर्डाने सीबीएसईच्या उत्तरपत्रिका डिजिटली तपासल्या आहेत. सध्या ऑन स्क्रिन मार्किंगची पद्धत दिल्ली विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठासह देशातील अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये वापरली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सुमारे ९८ लाख ६६ हजार उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मानवी कारणामुळे होणाऱ्या चुका संपुष्टात आल्या आहेत, असा दावा बोर्डाने केला आहे.

तसेच फिकट शाई किंवा स्कॅनिंगच्या समस्येमुळे स्पष्ट न दिसणाऱ्या सुमारे १३ हजार उत्तरपत्रिका पारंपारिक पद्धतीने तपासण्यात आल्या.

IIT Kharagpur Scholarship: जेईई ॲडव्हान्स्डनंतर आयआयटी खरगपूरमध्ये मिळणार मोफत शिक्षण! जाणून घ्या ‘MCM’ स्कॉलरशिपचे नियम

१९ मे पासून अर्ज करता येणार, पालकांना मोठा दिलासा

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल काही शंका किंवा संशय असेल, तर त्यांनी 19 मे 2026 पासून आपल्या गुणपत्रिकांच्या पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकनाकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर पुनर्तपासणीत विद्यार्थ्यांचे गुण वाढले तर त्यांची अतिरिक्त फी बोर्डाकडून परत केली जाईल, असे सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Cbse board osm system digital evaluation answer sheet scan copy fees reduced marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • CBSC Exam
  • CBSE Result

संबंधित बातम्या

CBSE 12th Supplementary Exam 2026: CBSE बोर्ड १२ वी सप्लीमेंट्री परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कधीपर्यंत करता येणार अर्ज?
1

CBSE 12th Supplementary Exam 2026: CBSE बोर्ड १२ वी सप्लीमेंट्री परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कधीपर्यंत करता येणार अर्ज?

CBSE 10th Second Board Result 2026: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार? ‘असा’ पहा रिजल्ट..
2

CBSE 10th Second Board Result 2026: सीबीएसई १० वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार? ‘असा’ पहा रिजल्ट..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.