फोटो सौजन्य- सोशल मीडिया
| वर्ष | एकूण मासिक पगार | इनहँड येणारा पगार | अग्निवीर कॉर्पस फंड कपात (३०%) | सरकारचे समान योगदान (३०%) |
|---|---|---|---|---|
| पहिले वर्ष | 30,000 रुपये | 21,000 रुपये | 9,000 रुपये | 9,000 रुपये |
| दुसरे वर्ष | 33,000 रुपये | 23,100 रुपये | 9,900 रुपये | 9,900 रुपये |
| तिसरे वर्ष | 36,500 रुपये | 25,500 रुपये | 10,950 रुपये | 10,950 रुपये |
| चौथे वर्ष | 40,000 रुपये | 28,000 रुपये | 12,000 रुपये | 12,000 रुपये |
या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत प्रत्येक अग्निवीराच्या स्वत च्या पगारातून लाख 5.04 रुपये कॉर्पस फंट (भविष्य निर्वाह निधी)मध्ये जमा होतो आणि तेवढीच रक्कम भारत सरकारही त्त्या फंडात जमा करते.
या चार वर्षाची सेवा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना एक रकमी सुमारे 10.04 लाखांचा सेवा निधी दिला जातो. विषेश म्हणजे ही रक्कम पूर्णपणे कर मुक्त असते. यामध्ये अग्निवीराचे स्वत:चे योगदान, सरकारचा समान हिस्सा आणि 4 वर्षांच्या काळातील व्याजाचा समावेश असतो. या आर्थिक पॅकेजशिवाय अग्निवीरांना 48 लाख रूपयांचा जीवन विमा कवच आणि अग्निवीर स्किल सर्टिफिकेट दिले जाते. ज्याचा उपयोग भविष्यात इतर नोकऱ्या मिळवण्यासाठी होऊ शकतो.






