Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये बसणार सीसीटीव्ही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 30, 2025 | 06:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन होण्यासाठी सीसीटीव्ही उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. या संदर्भातील बैठक मंत्रालयात मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता गणपतीच्या सुट्ट्या ५ दिवस नाही तर…; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार सुरेश म्हात्रे, आमदार सुलभा गायकवाड, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपसचिव प्रशांत पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले की, “जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढेल, त्यांची नियमित उपस्थिती आणि शाळेतील शिस्त नियंत्रणात राहील. यामुळे एकूणच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल.” त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. ठाणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत, मंत्री गोरे यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देण्याची गरज व्यक्त केली. जिल्ह्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून, त्याचा योग्य वापर करून कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.

मनोरुग्णांचा आत्मविश्वास वाढवणारी “स्किल इंडिया”ची संजीवनी!

शाळांची दुरुस्ती, इमारतींचे मजबुतीकरण, तसेच आवश्यक सुविधा पुरविण्याचे कामही प्राधान्याने करण्यात यावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास आणि आवास योजना या क्षेत्रांत ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम सुरू असून, येत्या काळात या सर्व योजनांचे उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विभागीय चौकशा वेळेत पूर्ण होण्यासाठी लवकरच एकसंध सूचना जारी करण्यात येणार असल्याचेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cctv to be installed in zilla parishad schools in thane district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • education news
  • thane

संबंधित बातम्या

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा
1

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
2

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
3

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला
4

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.