Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या

Maharashtra State Open : बॉम्बे जिमखाना आयोजित महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित महिमकरने पुरुष आणि 19 वर्षांखालील एकेरीचे विजेतेपद पटकावले. स्पृहा जोशी आणि अन्विषा घोरपडे यांनीही आपापल्या गटांत बाजी मारली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 16, 2026 | 05:24 PM
Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या

Maharashtra State Open : हर्षित महिमकरची दुहेरी मुकुटाला गवसणी! स्पृहा जोशी, अन्विषा घोरपडेही ठरल्या विजेत्या

Follow Us
Follow Us:
  • हर्षितकडून वेद भोईर पराभूत
  • स्पृहा जोशीचे दमदार पुनरागमन
  • दुहेरीत खेळाडूंची दमदार कामगिरी
 

Maharashtra State Open : बॉम्बे जिमखाना आयोजित योनेक्स सनराइज बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्रेटर मुंबईच्या हर्षित महिमकरने दुहेरी मुकुट पटकावत शानदार कामगिरी केली. पुरुष एकेरी आणि 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विजेतेपद मिळवत त्याने स्पर्धेवर आपली छाप पाडली. मुलींच्या 19 वर्षांखालील गटात मुंबई उपनगरच्या स्पृहा जोशीने, तर 17 वर्षांखालील गटात अन्विषा घोरपडेने विजेतेपद मिळवले.

हर्षितकडून वेद भोईर पराभूत

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात तिसरे मानांकन असलेल्या हर्षितने ठाण्याच्या चौथ्या मानांकित वेद भोईरचा 15-6, 15- 3 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. त्यानंतर 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीतही हर्षितने आपले वर्चस्व कायम राखले. अव्वल मानांकित हर्षितने पालघरच्या सहाव्या मानांकित ऋतुराज चिपटला 15-9, 15-5 असे पराभूत करत दुसरे विजेतेपद आपल्या नावावर केले.

स्पृहा जोशीचे दमदार पुनरागमन

मुलींच्या 19 वर्षांखालील एकेरीत मुंबई उपनगरच्या बिगरमानांकित स्पृहा जोशीने शानदार पुनरागमन केले. पहिला गेम गमावल्यानंतरही तिने संयम आणि जिद्द दाखवत ग्रेटर मुंबईच्या अन्विषा घोरपडेचा 12-15, 15-6, 16-14 असा पराभव केला. मात्र, अन्विषाने 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने इमान मोटरवाला हिचा 15-9, 15-7 असा पराभव केला.

Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल

दुहेरीत खेळाडूंची दमदार कामगिरी

इतर गटांत 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अक्षत रायसुराणा, मुलींच्या दुहेरीत खुशी पहावा आणि युविका बजाज, मिश्र दुहेरीत सोहम फाटक आणि सिया सिंग यांनी विजेतेपद पटकावले. मुलांच्या 19 वर्षांखालील दुहेरीत निधीश मोरे आणि यश ढेंबरे, तर 17 वर्षांखालील दुहेरीत अक्षत रायसुराणा आणि विक्रांत नेगी यांनी बाजी मारली. पुरुष दुहेरीत विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद मिळवले.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत अनेक उदयोन्मुख खेळाडू उदयास आले. जे पुढे जात देशासाठी उत्तुंग कामगिरी करण्यास सक्षम आहेत. ज्यात अनेक खेळाडूंचे नाव घेता येईल.

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: ग्रेटर मुंबईच्या हर्षित महिमकरने पुरुष एकेरी आणि 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले.

  • Que: मुलींच्या 19 वर्षांखालील गटात विजेती कोण ठरली?

    Ans: मुंबई उपनगरच्या स्पृहा जोशीने अन्विषा घोरपडेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कोणी केले होते?

    Ans: बॉम्बे जिमखानाने योनेक्स सनराइजच्या सहयोगाने महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले होते.

Web Title: Harshit mahimkar badminton double title maharashtra state open rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Badminton
  • Mumbai Suburban
  • thane

संबंधित बातम्या

Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल
1

Badminton Tournament : टॉप सीड युविका बजाजला स्पृहा जोशीचा धक्का; हर्षित महिमकरची दुहेरी विजेतेपदाकडे वाटचाल

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज
2

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज

Maharashtra Open : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत मानांकितांचा धडाका; विनय पाटील, हर्षित महिमकर विजयी
3

Maharashtra Open : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत मानांकितांचा धडाका; विनय पाटील, हर्षित महिमकर विजयी

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका
4

Thane News: जांभूळ गावाजवळ उल्हास नदीत शेकडो मासे मृतावस्थेत; आदिवासी मच्छिमारांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.