
Image
Central Silk Board Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय रेशीम बोर्डा (Central Silk Board – CSB) द्वारे विविध उप-केंद्रांमध्ये ‘रेशीम सहाय्यक’ (Sericulture Assistant) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण १४ पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे.
केंद्रीय रेशीम बोर्डाच्या वेगवेगळ्या उप-केंद्रांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत:
जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार, ही सर्व पदे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहेत. ही पदे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपाची सरकारी पदे नाहीत. त्यामुळे या नियुक्तीच्या आधारे भविष्यात नियमितीकरण किंवा सेवेत सामावून घेण्याचा कोणताही कायदेशीर हक्क उमेदवाराला प्राप्त होणार नाही.
सरकारी आणि कृषी/रेशीम क्षेत्रात कामाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.