Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CFA Institute Roundtable: फायनान्स क्षेत्रातील शिक्षणाचे भविष्य काय? सीएफए इन्स्टिट्यूटच्या गोलमेज परिषदेत नक्की काय चर्चा झाली?

CFA Institute All-India University Roundtable: मुंबईत आयोजित पहिल्या गोलमेज परिषदेत फायनान्स क्षेत्रातील बदलत्या गरजा, एआयचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य-आधारित शिक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाचा सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 05, 2026 | 04:24 PM
cfa

cfa

Follow Us
Follow Us:

CFA Institute Roundtable:सीएफए इन्स्टिट्यूट या गुंतवणूक क्षेत्रातील व्यावसायिकांच्‍या जागतिक संघटनेने नुकतेच मुंबईतीत पहिल्या ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबलचे आयोजन केले. फायनान्‍स क्षेत्रातील शिक्षणाचे भविष्य आणि जागतिक गुंतवणूक क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार शैक्षणिक रचनेत सुधारणा करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

या गोलमेज परिषदेतील चर्चा प्रामुख्याने सीएफए इन्स्टिट्यूटच्या कौशल्य-आधारित शिक्षण उपक्रमाभोवती केंद्रित होती. बाजारपेठेतील प्रत्‍यक्ष कामासाठी तयार असणाऱ्या प्रतिभावान तरुणांची वाढती मागणी पूर्ण करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि गुंतवणूक क्षेत्रात या उपक्रमाचे महत्त्व टिकवून ठेवणे या उद्देशाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. तसेच यामध्ये अभ्यासक्रमाची सांगड घालणे, प्राध्यापकांचा सहभाग वाढवणे आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता व करिअरची पूर्वतयारी सुधारणा या उपक्रमांचा समावेश होता.

फायनान्स क्षेत्रात एआय (AI) चा वाढता वापर

अलीकडच्या कंपन्या आता निव्वळ सिद्धांतांवर आधारित ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक, व्यावहारिक क्षमता आणि खऱ्या आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या कौशल्याला अधिक महत्त्व देत आहेत, हाच मुख्य निष्कर्ष या परिषदेतून समोर आला. या संवादादरम्यान फायनान्‍स क्षेत्रातील करिअरमध्ये तंत्रज्ञान व एआयचा वाढता वापर यांसारख्या नवीन प्रवाहांवरही प्रकाश टाकण्यात आला.

CBSE 12th Revaluation 2026: पोर्टल सुरू होताच १५ लाख युझर्स एकाच वेळी? सीबीएसईने पुनर्मूल्यांकनाबाबत काय दिली माहिती?

या गोलमेज परिषदेच्या महत्त्वाविषयी मत व्‍यक्त करत सीएफए इन्स्टिट्यूटचे भारतातील युनिव्हर्सिटी रिलेशन्स मॅनेजर साईम फकीह म्हणाले की, “आमची ही पहिलीच ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबल होती, ज्‍यामधून शैक्षणिक क्षेत्रासोबत राष्ट्रीय पातळीवर मजबूत संबंध निर्माण करण्याप्रती आणि फायनान्‍स क्षेत्रातील शिक्षणाला उद्योग जगताच्या गरजांशी सुसंगत करण्याप्रती कटिबद्धता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता.”

नामांकित संस्थांमधील प्राध्यापक एकत्र

या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील अनेक नामांकित संस्थांमधील प्राध्यापक एकत्र आले होते. यामध्ये डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, जैन (डीम-टू-बी युनिव्‍हर्सिटी), मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, वोक्सन युनिव्हर्सिटी, आयएमआय दिल्ली, आयआयटी भुवनेश्वर, आयआयटी खडगपूर, चंदीगड युनिव्हर्सिटी, आसाम डाऊनटाऊन युनिव्हर्सिटी, जिंदाल स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स (ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी), लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एक्सआयएम युनिव्हर्सिटी, शिव नादार युनिव्हर्सिटी, बेनेट युनिव्हर्सिटी आणि सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स यांसारख्‍या संस्थांचा समावेश होता.

Fire Accidents in Lanes: रुंद रस्त्यांपेक्षा अरुंद गल्ल्यांमध्येच अग्निकांडाच्या सर्वाधिक घटना का घडतात? जाणून घ्या कारणे!

ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबलसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सीएफए इन्स्टिट्यूट भारतातील युनिव्‍हर्सिटीजसोबत आपले संबंध अधिक दृढ करत आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर महत्त्वाच्या, नैतिक आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अशा फायनान्‍स क्षेत्रातील व्यावसायिकांच्या विकासाला गती मिळत आहे.

Web Title: Cfa institute first all india university mumbai finance education ai trends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • ai
  • education
  • finance

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
4

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.