
STUDY ABROAD
Study Abroad Cheapest Countries: परदेशात शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचे असते. परंतु, तेथील शिक्षणाचा खर्च हा विद्यार्थ्यांंना परवणारा नसतो. विदेशातील ट्यूशन फीव्यतिरिक्त राहणे, खाणे, प्रवास आणि इतर आवश्यक खर्च जोडल्यास एकूण बजेट खूप वाढते. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. त्यांच्यासाठी परदेशातून पदवी घेणे महागडे ठरते. आशा वेळी विद्यार्थी स्वस्त शिक्षण मिळणाऱ्या देशात करिअर करण्यासाठी संधी शोधत असतात. चला तर मग जाणून घेऊया, जिथे भारतीय विद्यार्थी कमी बजेटमध्ये अभ्यास करू शकतात.
जर्मनीमधून तुम्ही उच्च शिक्षण स्वस्तात तर घेऊ शकता तसेच येथील अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फायदा मिळू शकतो. जर्मनीमध्ये अशी सरकारी विद्यापीठे(Public Universities) आहेत. जिथे प्रवेश घेतल्यानंतर तेथे ट्युशन फी आकारली जात नाही किंवा ती अतिशय नाममात्र असते. करिअरचा विचार केल्यास येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग, आयटी (IT), मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात नोकरीच्या सर्वोत्तम संधी मिळतात.
इटलीचा विचार केला तर तेथे शिक्षण घेणे खूप परवडणारे आहे. जर विद्यार्थ्यांला तिथली प्रादेशिक स्कॉलरशिप(Regional Scholarship) मिळाली तर ट्युशन फीपासून ते राहण्याचा खर्चही खूप कमी होतो. तसेच विद्यार्थ्यांना ‘पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा’चा (Post-Study Work Visa) चा देखील मोठा फायदा मिळू शकतो. येथे इंजिनिअरिंग, हॉस्पिटॅलिटी, डिझाईन, बिझनेस यांसारख्या क्षेत्रामध्ये उत्तम वाव मिळतो. जर तुम्हाला इटालियन भाषेचे ज्ञान असेल तर तुम्हाला नोकरीच्या अधिक संधी मिळू शकतात.
हंगेरीमध्ये अशी अनेक विद्यापीठे आहेत, जी कमी ट्युशन फी आणि स्कॉलरशिपच्या संधी देतात. येथील विद्यापीठातील अनेक आंतरराष्ट्रीय कोर्सेस आणि सरकारी विद्यापीठांमधील शिक्षण खूपच कमी फीमध्ये उपलब्ध असते. शेअर्ड सर्व्हिसेसपासून ते तंत्रज्ञानापर्यंत हा देश एक प्रमुख हब बनत आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.