
2 जानेवारी 1961 ला पोलिस दलाची स्थापना झाली. यामुळे 2 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत राज्यात पोलिस सप्ताह साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ठाण्याला भेट देत कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी उपनिरीक्षक लहू घोडे, राजेंद्र बनकर, सचिन काळे, रामेश्वर जाधव, यतीन कुलकर्णी, संजय वाघे, राजेंद्र काकडे, मंगेश आरके यांच्यासह सचिन कळम, विशाल शिंदे, प्रवीण देशपांडे, दर्शना देशपांडे, कांचन पाटील, विलास आग्रे, चौधरी, पंढरीनाथ मोरे, विनोद गव्हाड आदी उपस्थित होते. यावेळी विद्यध्यर्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह
पोलिस दलासांदर्भात लहानमोठ्चांमध्ये आदर तेवढाच धाक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अहोरात्र कर्तव्य निभावत असतात. पोलिसांचे काकाज कसे चालते याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती, त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.