Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहागंज चौकात फळबाजार आणि इतर व्यापाऱ्यांची दुकाने थाटली जातात. चौकाच्या चारही बाजुंनी हातगाड्यांच्या विळखात असते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 27, 2026 | 02:20 PM
शहागंजमध्ये महापालिकेचा 'बुलडोझर'! (Photo Credit- X)

शहागंजमध्ये महापालिकेचा 'बुलडोझर'! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’!
  • गर्भवती महिलेला मारहाण नडली
  • रस्ते केले चकाचक
छत्रपती संभाजीनगर शहागंज परिसरात हातगाडीवरील फळ विक्रेत्यांकडून एका तरुणासह गर्भवती महिलेला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी पहाटेच महापालिकेने आक्रमक पवित्रा घेत अतिक्रमण हटवण्याची संयुक्त कारवाई राबविली. पोलिस बंदोबस्तात शहागंज मुख्य रस्त्यावरील हातगाड्या, पत्र्याचे शेड व फूटपाथवरील वाढीव बांधकामांवर बुलडोझर फिरविण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून हिंदी महाविद्यालय पर्यंतचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आला. तर दुसरी कारवाई आमखास मैदानासमोरील कॅन्सर हॉस्पीटलमागे असलेल्या मार्गावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली.

शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहागंज चौकात फळबाजार आणि इतर व्यापाऱ्यांची दुकाने थाटली जातात. चौकाच्या चारही बाजुंनी हातगाड्यांच्या विळखात असते. त्याचबरोबर छोट्या व्यवसायिकांनी दुकानासमोर पाच ते सहा फूट रुंद वटे बांधून त्यावर शेड टाकून मोठा रस्ता अरुंद करुन ठेवला होता. दुकानासमोर कोणी दुचाकी लावल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या कारणावरून चौकात अनेकदा वादावादीनंतर घटना घडल्या आहेत.

बुधवारी सायंकाळी एका दुकानदाराने गरोदर महिलेसह तिच्या पतीस जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, नागरी मित्र पथकप्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी व पोलीस शहागंजमध्ये दाखल झाले. जेसीबी व ट्रकच्या ताफ्यासह सुरू झालेल्या कारवाईची चाहूल लागताच हातगाडी धारकांनी गाड्यावरील माल हलवला. अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांनी जेसीबीचालकाच्या अंगावर धावून जात विरोध करण्याचा प्रयत्न केला. अशीच दुसरी कारवाई आमखास मैदानासमोरील मार्गावर करण्यात आली.

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

पत्र्याचे शेड पथकाने केले जमीनदोस्त….

किराणा चावडी पोलीस चौकीसमोर झाडाखाली लागणाऱ्या हातगाड्यांमुळे अडथळा होत असल्याने ते झाड तोडण्यात आले. पोलीस चौकीमागील गल्लीतील चप्पल मार्केटमधील गाळ्यांसमोरील अतिक्रमणावरही कारवाई करण्यात आली. दोन्ही मार्गावरील हातगाड्या हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढे रस्त्यावर व्यवसाय केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.

मारहाणीच्या घटनेने उडाली खळबळ

बुधवारी काही फळ विक्रेत्यांनी एका तरुणासह त्याच्या पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसह खरेदीसाठी आले असता दुचाकी लावण्यावरून वाद झाला, शिवीगाळ करत सात-आठ जणांनी खाली पाडून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

रस्ता अडविण्याचा अधिकार नाही…

रमजानव्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्याचा आरोप फेटाळताना संतोष वाहुळे म्हणाले, दिवाळीच्या काळात गुलमंडी परिसरातही कारवाई करण्यात आली होती, प्रशासन भेदभाव करत नाही. रस्ता अडवून व्यवसाय करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हातगाड्या कायमच्या जप्त….

यापुढे रस्त्यावर हातगाड्या लावल्यास त्या कायमस्वरूपी जप्त केल्या जातील, तसेच मालही जप्त करण्यात येईल असे धोरण राबविण्यात येणार असल्याचे वाहुळे यांनी सांगितले, व्यवसाय करावयाचा असल्यास भाजीमंडईत उपलब्ध जागा किंवा गाळे घ्यावेत, बेशिस्तपणामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून गर्भवती महिलेला मारहाण झाल्याची घटना गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना त्रास होऊ नये, हा प्रशासनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Web Title: Municipal corporations bulldozer in shahaganj pregnant woman beaten up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट
2

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा
3

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
4

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.