फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्स (CISF)ने भरतीला सुरुवात केली आहे. कॉन्स्टेबल तसेच ट्रेड्समनच्या रिक्त जागा आणि पदे भरण्यासाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरती संदर्भात ऑनलाईन जाहिरात सादर करण्यात आली आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहात तर नक्कीच या संधीचा लाभ घेत चला. या भरतीसाठी मुळात दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
अद्याप या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ५ मार्च २०२५ पासून अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात येणार आहे. तर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ३ एप्रिल २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण रिक्त १,१६१ जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे सर्व निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेसंदर्भात काही निकष पात्र करावे लागणार आहेत.
दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून SSC उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जाहिरातीमध्ये नमूद निकषांनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर उमेदवाराचे जास्तीत जास्त वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित वर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
CISF मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती होण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम शारीरिक मानक चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाईल. पुढील टप्प्यात कागदपत्र पडताळणी होईल. यानंतर ट्रेड टेस्ट, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी पार पडेल. सर्व टप्प्यांत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,700–₹69,100 प्रति महिना पगार दिला जाईल.
CISF मध्ये भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. कॉन्स्टेबल/ट्रेड्समन रिक्रूटमेंट 2025 अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुमच्या मूलभूत माहिती भरून लॉगिन क्रेडेन्शियल तयार करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ₹100 शुल्क आहे, तर SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.