फोटो सौजन्य - Social Media
प्रयत्न किती महत्वाचे असतात, हे पटवून देण्यासाठी इशिता किशोरची यशोगाथा पुरेशी आहे. कधी कधी आपण एकदा प्रयत्न करतो आणि आपल्याला हवे तसे न झाल्यास आपण त्या गोष्टीचा विचार सोडून देतो. पण तेव्हा आपण हे लक्षात नाही घेत की आपल्याला अपयशाने फार मोठा अनुभव दिलेला असतो. अशीच काही कथा आहे इशिता किशोरची! इशिताने एकदा नाही तर तब्बल तीनवेळा UPSC परीक्षा दिली आहे. त्यातील दोन प्रयत्नात तिला फक्त नि फक्त अपयश हाती आले आहे. पण तिने प्रयत्न आणि जिद्द न सोडता तिसऱ्यांदा रणांगणात उतरण्याचे ठरवले आणि UPSC परीक्षेस Rank 1 ने उत्तीर्ण केले. तिची नियुक्ती इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी झाली आहे.
तिच्या कुटुंबाचा इतिहास पाहता तिचे वडील संजय किशोर सैन्यात विंग कमांडर होते. तसेच आई रिटायर्ड शिक्षिका आणि भाऊ वकील आहे. तिचे बालपण नोएडामध्ये गेले. इशिताचे शालेय शिक्षण एअर फोर्स बाळ भरती स्कुल येतेच झाले असून पुढील शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून झाले आहे. तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत इशिताची नियुक्ती IAS म्हणून करण्यात आली आहे. घरात सैन्याचे वातावरण असल्यामुळे शिस्त हा गुणधर्म तिला वारसा म्हणून मिळाला होता.
इशिताचा शैक्षणिक प्रवास अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. तिने राजनीती विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयांसह UPSC परीक्षेत यश मिळवले आहे. त्याआधी, तिने दिल्लीतील प्रतिष्ठित श्रीराम कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयात पदवी संपादन केली आहे. शालेय जीवनापासूनच इशिता अत्यंत मेधावी विद्यार्थिनी राहिली असून, प्रत्येक टप्प्यावर तिची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
UPSC CSE 2022 परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवणारी इशिता ही शैक्षणिक क्षेत्रात आधीपासूनच टॉपर राहिली आहे. लहानपणापासूनच तिचे स्वप्न IAS अधिकारी बनण्याचे होते. तिचे वडील सरकारी सेवेत कार्यरत असल्याने, त्यांच्यासारखे देशसेवा करणे हेच तिचे अंतिम ध्येय होते. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तिने UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तिच्या मेहनतीला यश मिळाले असून, तिच्या या प्रवासाने अनेक नव्या उमेदवारांना प्रेरणा मिळत आहे.