Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

College Ragging: कॉलेजमध्ये सामान्य ओळख आणि रॅगिंगमधील नेमका फरक काय? जाणून घ्या UGC चे नियम आणि तक्रार करण्याची पद्धत..

College Ragging : कॉलेजमध्ये सीनियर्ससोबतच्या गप्पा आणि रॅगिंगमधील फरक काय आहे? रॅगिंगविरोधात यूजीसीचे (UGC) नियम आणि हेल्पलाइन नंबरची माहिती सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 17, 2026 | 04:03 PM
collage ragging

collage ragging

Follow Us
Follow Us:

College Ragging : कोणत्याही स्टूडेंटसाठी कॉलेज लाईफमध्ये एंट्री करणे एका नवीन आणि रोमांचक प्रवासाची सुरुवात असते. नवीन मित्र, नवीन वातावरण आणि नवीन आशा या प्रवासाला खास बनवतात. पण अनेकदा सीनियर आणि जुनियरच्या ओळखीच्या किंवा ‘इंट्रोडक्शन’च्या नावाखाली काही अशा घटना घडतात, ज्या मनामध्ये भीती निर्माण करतात. अशा वेळी नवीन स्टुडंट्सच्या मनात वारंवार हा प्रश्न उपस्थित होतो की, सीनियर्ससोबतची सामान्य बातचीत आणि रॅगिंगमधील सीमारेषा नेमकी कुठे संपते?

अनेकदा स्टुडंट्स असा समज करून घेतात की, जोपर्यंत कोणतीही शारीरिक मारहाण किंवा गंभीर वाद होत नाही, तोपर्यंत ती रॅगिंग नसते. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. एखाद्या फ्रेशर किंवा फर्स्ट इयरच्या स्टुडंटला मानसिक त्रास देणे, अपमानित करणे किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करायला लावून घेणे हे रॅगिंगच्या कक्षेत येते. यामध्ये बळजबरीने किंवा विचित्र पद्धतीने नमस्कार करायला लावणे इत्यादी बाबींचाही समावेश होतो. तुमच्यासोबत रॅगिंग होत आहे की नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय केले पाहिजे, हे समजून घेण्यासाठी UGC चे नियम माहीत असणे गरजेचे आहे.

रॅगिंगचे प्रकार: तुमच्यासोबत रॅगिंग होत आहे का?

रॅगिंग रोखण्यासाठी युजीसीने अनेक नियम बनवले आहेत. या परिस्थितीत एफआयआर (FIR) दाखल करण्याचीही तरतूद आहे. पण तरीही रॅगिंगच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. रॅगिंगमध्ये कशाचा समावेश होतो, ते जाणून घ्या:

१. मानसिक त्रास आणि अपमान करणे

  • जर एखादा सीनियर तुमच्या मर्जीशिवाय अशी कामे करून घेत असेल ज्यामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटेल, तर ती रॅगिंग आहे. उदाहरणार्थ-सर्वांसमोर विचित्र किंवा अयोग्य गाणे गाण्यास किंवा डान्स करण्यास भाग पाडणे.
  • शिवीगाळ करणे, शारीरिक रूप, भाषा किंवा पार्श्वभूमीची खिल्ली उडवणे.
  • आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे शब्द उच्चारणे किंवा विनाकारण ओरडणे.
२. वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध
  • जर कोणी कॉलेज किंवा हॉस्टेलमध्ये तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यास सामान्य ओळख म्हटले जाऊ शकत नाही
  • तुम्हाला तुमच्याच खोलीत जाण्यापासून, झोपण्यापासून किंवा अभ्यास करण्यापासून रोखणे.
  • विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यास, विचित्र हेअरस्टाईल करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने चालण्यास भाग पाडणे.
  • सीनियर्सची वैयक्तिक कामे करायला लावणे, जसे की त्यांचे असाइनमेंट लिहिणे, कपडे धुणे किंवा कॅन्टीनमधून सामान आणणे.
NSP Scholarship 2026: नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता आणि नियम एका क्लिकवर..

३. शारीरिक त्रास देणे किंवा बळजबरी करणे

  • विनाकारण दीर्घकाळ उन्हात उभे करणे, उठबशा काढायला लावणे किंवा कठीण कामे सांगणे.
  • तुम्हाला नको असलेली कोणतीही गोष्ट बळजबरीने खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी दबाव टाकणे.
  • कोणत्याही प्रकारचा शारीरिक संपर्क साधणे किंवा हाणामारी करणे.
४. आर्थिक शोषण
  • जर एखादा सीनियर तुमच्या मर्जीशिवाय तुमच्याकडे पैसे किंवा वस्तूंची मागणी करत असेल, तर हा देखील रॅगिंगचाच एक भाग आहे. यात पुढील गोष्टी येतात.
  • तुमच्याकडून स्वतःच्या खाण्यापिण्याचे बिल भरवून घेणे किंवा कॅन्टीनमध्ये बळजबरीने पार्टी मागणे.
  • तुमच्या परवानगीशिवाय तुमची पुस्तके, नोट्स, लॅपटॉप किंवा इतर वैयक्तिक वस्तू घेणे आणि परत न करणे.
FSSAI New Rules: शाळेत मुलांना मिळणाऱ्या जेवणात होणार ‘हे’ मोठे बदल; FSSAI ने आणले कडक नियम!

रॅगिंग झाल्यास काय करावे?

जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर तो मुकाटपणे सहन करण्याऐवजी तात्काळ योग्य ती पावले उचला. तुमच्या कॉलेजच्या ‘अँटी-रॅगिंग कमिटीशी’ (Anti-Ragging Committee) संपर्क साधा किंवा UGC च्या टोल-फ्री हेल्पलाइन नंबर १८००-१८००-५५२२ वर आपली तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा आणि सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.

Web Title: College ragging vs general interaction ugc guidelines marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • College
  • education

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार
4

Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.