
Image
यामध्ये करिअर करण्यासाठी १२ ला विज्ञान शाखा निवडणे अधिक योग्य ठरेल. पदवी घेऊन सायंटिस्ट आणि संशोधनाशी संबंधित अनेक पदांसाठी त्याच विषयातील मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी इंजिनिअरिंगची पदवीही मागितली जाते. त्यामुळे ज्या पदासाठी तयारी करायची असेल, त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आधी तपासून घ्यावी.
यामध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून भरती केली जाते. सायंटिस्ट-बी सारख्या पदांवर भरती यूपीएससीमार्फत होते. २०२६ मध्ये यूपीएससीने आयएमडीसाठी जनरल मीटियोरोलॉजी, ॲटमॉस्फेरिक सायन्सेस आणि इन्स्टुमेंटेशनमध्ये सायंटिस्ट-बी पदांची भरती जाहीर केली होती. तर सायंटिफिक असिस्टंटच्या पदांवर एसएससीच्या (SSC) ज्युनियर इंजिनिअर परीक्षांद्वारे भरती झाली. यासाठी फिजिक्स विषयासह सायन्समध्ये पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित विषयांमध्ये पदवी मागितली होती, तर इतर पदांसाठी फिजिक्स आणि मॅथ्स अनिवार्य होते. हा विभागाकडून वेळोवेळी प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि इतर तात्पुरत्या पदांसाठी अर्ज मागवले जातात.
नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांच्या अधिकृत वेबसाईटवरील रिक्रूटमेंट सेक्शन तसेच यूपीएससी आणि एसएससीच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे. नोटिफिकेशनमध्ये पद, पदवी, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची मुदत आणि निवड पद्धत काळजीपूर्वक वाचावी. जुनी जाहिरात पाहून पात्रता ठरवू नये, कारण वेळोवेळी पदानुसार पात्रता नियम बदलतात. हवामानाशी संबंधित कामात फिजिक्स आणि मॅथ्ससोबतच कॉम्पुटरवर डेटा समजून घेणे आणि त्याचे विश्लेषन करणे गरजेजे असते.
Ans: IMD मध्ये करिअर करण्यासाठी १२ वीला विज्ञान (Science) शाखा निवडणे योग्य ठरते; पुढे संबंधित विषयातील पदवी, मास्टर्स डिग्री किंवा इंजिनिअरिंगची पात्रता पदानुसार आवश्यक असते.
Ans: सायंटिस्ट-बी सारख्या पदांवर UPSC मार्फत, सायंटिफिक असिस्टंट पदांवर SSC परीक्षेद्वारे, तर प्रोजेक्ट सायंटिस्ट व तात्पुरत्या पदांवर विभागाकडून थेट जाहिरातीद्वारे भरती केली जाते.
Ans: IMD, UPSC आणि SSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाहिराती पहाव्यात; तसेच संगणकावरील डेटा विश्लेषण (Data Analysis) आणि संबंधित तांत्रिक कौशल्ये उपयुक्त ठरतात.