फोटो सौजन्य- सोशल मीडिया
CRPF Sports Quota Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या क्रीडापटूंसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘सीआरपीएफ’ने क्रीडा कोटा भरती २०२६ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२१ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती २२ विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी आहे.
ही अर्ज प्रक्रिया १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून उमेदवार ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुकांना सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
एकूण ५२१ रिक्त पदांमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या १८२ जागा (१५० पुरुष + ३२ महिला) असतील. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कॉन्स्टेबलच्या ३३९ पदांचा (२५८ पुरुष + ८१ महिला) समावेश आहे. ज्यामध्ये उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल पद: मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू; किंवा नॅशनल गेम्स/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पदक किंवा तिसरे स्थान पटकावणारे; तसेच इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम किंवा द्वितीय स्थान आणि ज्युनियर नॅशनलमध्ये सुवर्ण/रौप्य पदक विजेते खेळाडू पात्र ठरतील.
कॉन्स्टेबल पद: सीनियर किंवा ज्युनियर नॅशनल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले; नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी/युथ/विंटर गेम्समधील विजेते आणि इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र आहेत.
कालावधी: खेळाडूंची ही कामगिरी ३० सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील असावी.
वयोमर्यादा: दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे (वयाची गणना १ ऑगस्ट २०२६ च्या आधारे होईल). उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट २००३ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००८ नंतरचा नसावा.
वयोमर्यादेत सूट: सामान्य (UR) – ५ वर्षे, ओबीसी (OBC-NCL) – ८ वर्षे, आणि एससी/एसटी (SC/ST) – १० वर्षे सूट.
हेड कॉन्स्टेबल (GD): पे लेव्हल ४ (₹२५,५०० ते ₹८१,१००)
कॉन्स्टेबल (GD): पे लेव्हल ३ (₹२१,७०० ते ₹६९,१०0)
अर्ज शुल्क: ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस पुरुषांसाठी ₹१००. महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवडीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:
छाती (केवळ पुरुषांसाठी): न फुगवता ८० सेमी आणि ५ सेमी फुगवणे अनिवार्य. (नियमांनुसार विशिष्ट प्रवर्गांना शारीरिक निकषांत सूट दिली जाईल).
Devendra Fadnavis on MPSC : एमपीएससीत होणार विक्रमी महाभरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
1. सर्वप्रथम सीआरपीएफच्या अधिकृत भरती संकेतस्थळाला (rect.crpf.gov.in) भेट द्या.
2. तुमच्या क्रीडा प्राविण्याचे प्रमाणपत्र अपलोड करा.
3. ऑनलाइन फॉर्ममध्ये वैयक्तिक व क्रीडाविषयक माहिती अचूक भरा.
4. लागू असल्यास ₹१०० अर्ज शुल्क भरा.
5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.






