Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

CRPF Sports Quota Recruitment 2026 : गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 'सीआरपीएफ'ने क्रीडा कोटा भरती २०२६ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२१ जागांसाठी अर्ज मागवले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 24, 2026 | 10:07 AM
sport quota

sport quota

Follow Us
Follow Us:

CRPF Sports Quota Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या क्रीडापटूंसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘सीआरपीएफ’ने क्रीडा कोटा भरती २०२६ अंतर्गत हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५२१ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती २२ विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी आहे.

ही अर्ज प्रक्रिया १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून उमेदवार ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुकांना सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

५२१ जागांचे वर्गीकरण आणि शैक्षणिक पात्रता

एकूण ५२१ रिक्त पदांमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या १८२ जागा (१५० पुरुष + ३२ महिला) असतील. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कॉन्स्टेबलच्या ३३९ पदांचा (२५८ पुरुष + ८१ महिला) समावेश आहे. ज्यामध्ये उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

क्रीडा अर्हता

हेड कॉन्स्टेबल पद: मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू; किंवा नॅशनल गेम्स/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पदक किंवा तिसरे स्थान पटकावणारे; तसेच इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम किंवा द्वितीय स्थान आणि ज्युनियर नॅशनलमध्ये सुवर्ण/रौप्य पदक विजेते खेळाडू पात्र ठरतील.

कॉन्स्टेबल पद: सीनियर किंवा ज्युनियर नॅशनल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केलेले; नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी/युथ/विंटर गेम्समधील विजेते आणि इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र आहेत.

कालावधी: खेळाडूंची ही कामगिरी ३० सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील असावी.

वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज शुल्क

वयोमर्यादा: दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे (वयाची गणना १ ऑगस्ट २०२६ च्या आधारे होईल). उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट २००३ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००८ नंतरचा नसावा.

वयोमर्यादेत सूट: सामान्य (UR) – ५ वर्षे, ओबीसी (OBC-NCL) – ८ वर्षे, आणि एससी/एसटी (SC/ST) – १० वर्षे सूट.

वेतन श्रेणी (Salary):

हेड कॉन्स्टेबल (GD): पे लेव्हल ४ (₹२५,५०० ते ₹८१,१००)

कॉन्स्टेबल (GD): पे लेव्हल ३ (₹२१,७०० ते ₹६९,१०0)

अर्ज शुल्क: ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस पुरुषांसाठी ₹१००. महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त

निवड प्रक्रिया आणि शारीरिक निकष

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. निवडीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:

  • कागदपत्र पडताळणी
  • शारीरिक मानक चाचणी व स्पोर्ट्स ट्रायल
  • वैद्यकीय तपासणी

शारीरिक निकष:

उंची: पुरुष उमेदवारांसाठी किमान १७० सेमी आणि महिला उमेदवारांसाठी १५७ सेमी.

छाती (केवळ पुरुषांसाठी): न फुगवता ८० सेमी आणि ५ सेमी फुगवणे अनिवार्य. (नियमांनुसार विशिष्ट प्रवर्गांना शारीरिक निकषांत सूट दिली जाईल).

Devendra Fadnavis on MPSC : एमपीएससीत होणार विक्रमी महाभरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

अर्ज कसा करावा?

1. सर्वप्रथम सीआरपीएफच्या अधिकृत भरती संकेतस्थळाला (rect.crpf.gov.in) भेट द्या.

2. तुमच्या क्रीडा प्राविण्याचे प्रमाणपत्र अपलोड करा.

3. ऑनलाइन फॉर्ममध्ये वैयक्तिक व क्रीडाविषयक माहिती अचूक भरा.

4. लागू असल्यास ₹१०० अर्ज शुल्क भरा.

5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

Web Title: Crpf sports quota recruitment 2026 apply online 521 posts details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • CRPF
  • government jobs
  • Jobs Recruitment
  • Maharashtra Sports

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!
1

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
3

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?
4

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.