Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Education : छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या 1268 विद्यार्थ्यांना पदवी तर 34 जणांना पिएचडी बहाल

शेंडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या (CSMU) तृतीय पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांतील 1268 विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन राष्ट्रविकासासाठी करण्याचे आवाहन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 04:34 PM
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या 1268 विद्यार्थ्यांना पदवी तर 34 जणांना पिएचडी बहाल

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या 1268 विद्यार्थ्यांना पदवी तर 34 जणांना पिएचडी बहाल

Follow Us
Close
Follow Us:
  • CSMUच्या तृतीय पदवीदान समारंभात 1268 विद्यार्थ्यांना पदवी
  • राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
  • शेंडूंगमधील CSMU पदवीदान सोहळा उत्साहात
 

राकेश खराडे, रसायनी : शेंडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) तृतीय पदवीदान समारंभ शुक्रवारी, 29 मे 2026 रोजी विद्यापीठ परिसरातील जी. डी. बडाया ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध विद्याशाखांतील 1268 विद्यार्थ्यांना पदव्या व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनातून शौर्य, राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. पदवी प्राप्त करणे ही जीवनातील महत्त्वाची उपलब्धी असली तरी बौद्धिक आणि सामाजिक स्तरावरही स्वतःचा विकास करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीची ओळख नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सचोटी यांमध्ये असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या मूल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि संस्कारांचा उपयोग समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Study Tips : फक्त 33% नाही, 90% गुणांचे लक्ष्य! इंग्रजीत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी ‘ही’ भन्नाट ट्रिक ठरेल फायदेशीर

समारंभाची सुरुवात विद्यापीठाचे कुलपती डॉ. केशव बडाया यांनी पदव्या व प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या घोषणेद्वारे केली. यावेळी एकूण 1268 पदव्या व प्रमाणपत्रांना मान्यता देण्यात आली. यामध्ये 34 पीएच.डी., 535 पदव्युत्तर पदव्या तसेच विविध पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या पदव्यांचा समावेश होता. डॉ.केशव बडाया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रख्यात शास्त्रज्ञ आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक प्रा. (डॉ.) शेखर सी. मांडे यांनी विशेष अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नवोपक्रम, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करत भारताच्या नेतृत्वाखाली जगाला नवी दिशा देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे आणि देशाचा गौरव वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. या समारंभाला विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कमी भांडवलात मोठी कमाई! नोकरीसोबतही करता येतील हे 8 छोटे व्यवसाय; कमी गुंतवणुकीत चांगली कमाईची संधी

Web Title: Csmu third convocation 1268 students degree governor haribhau bagde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Haribhau Bagde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.