Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Juchandra College: व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र कॉलेजच्या युवकांचा निर्धार! अंमली पदार्थविरोधी घेण्यात आली शपथ

व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी–स्वयंसेवकांनी तांदुळवाडीतील निवासी शिबिरात व्यसनमुक्ती, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीवर मार्गदर्शन घेतले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 21, 2025 | 04:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यसनमुक्ती या विषयांवर विद्यार्थी–स्वयंसेवकांना मार्गदर्शन
  • समाजात व्यसनमुक्तीचा प्रसार करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घ्यावा
  • पस्थितांनी अंमली पदार्थविरोधी शपथ
व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घेतला तर समाजात मोठा बदल घडू शकतो, हा संदेश देत जूचंद्र येथील सह्याद्री शिक्षण सेवा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा दृढ संकल्प व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तांदुळवाडी येथे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जीवनमूल्ये, आरोग्य, सामाजिक जबाबदारी आणि व्यसनमुक्ती या विषयांवर विद्यार्थी–स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. (determination of the youth of Juchandra College to get rid of addiction)

वडाळ्यात उपप्राचार्याच्या राजीनाम्यावरून शिक्षकांचा महाएल्गार! म्हणाले “जबरदस्तीने राजीनामा…”

या शिबिरात नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी “Say No To Drugs, Yes To Life” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. “व्यसन सोडा, माणसे जोडा; जीवन सुंदर आहे, व्यसनमुक्त राहा,” या संदेशातून त्यांनी अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन, सामाजिक माध्यमांचा परिणाम, अमली पदार्थांचे जाळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. समाजात व्यसनमुक्तीचा प्रसार करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिराच्या वातावरण निर्मिती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा भावनिक परिणाम आणि आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत माहितीपट, गटचर्चा आणि नाटकांच्या माध्यमातून जाणीव करून देण्यात आली. समुपदेशन तज्ज्ञांनी “प्रेशर नसताना व्यसन का वाढते?”, “मानसिक आरोग्य आणि व्यसन”, “तरुणांच्या आयुष्यातील योग्य निवडी” या विषयांवरही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तीकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “व्यसनमुक्त पिढी घडवणे ही आजची गरज आहे. युवा पिढीने समाजात सकारात्मकता निर्माण करून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा.” राष्ट्रीय सेवा योजनेचे पालघर जिल्हा समन्वयक डॉ. दिपा दळवी, विभागीय समन्वयक वंदना सिंग, कार्यक्रम अधिकारी गौतम गायकवाड, अॅड. शिवानी सावंत यांचीही उपस्थिती लाभली.

TET परीक्षा परवावर! परीक्षाकेंद्रावर मोठी सुरक्षा, उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या

राष्ट्रीय सेवा योजनेचे तब्बल १०३ स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून टीमवर्क, नेतृत्वगुण, समाजसेवा आणि सामाजिक जाणीव या मूल्यांचा अनुभव घेतला. शिबिरात आरोग्य जागरूकता, स्वच्छता मोहीम, ग्रामसफाई, वृक्षारोपण आणि संवाद सत्रे घेण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी अंमली पदार्थविरोधी शपथ घेऊन करण्यात आली. “व्यसनमुक्त भारत” घडवण्याच्या दिशेने युवकांनी घेतलेला हा संकल्प प्रशंसनीय असल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिराची माहिती नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य आणि नशाबंदी मंडळ पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी दिली.

Web Title: Determination of the youth of juchandra college to get rid of addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Career
  • Palghar news

संबंधित बातम्या

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य
1

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या
2

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
3

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
4

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.