Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे ७५ ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2024 | 02:39 PM
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे ७५ ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर (फोटो सौजन्य-X)

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे ७५ ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

राज्यातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय २६ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जारी केला आहे. विशेष म्हणजे, ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, तत्काळ बैठक आयोजित करून पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांत हा निर्णय घेऊन शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली, ज्यामुळे ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी २०१९-२० पासून परदेश शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची संख्या ७५ करण्यात आली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागवण्यात आले होते.

अर्जांची छाननी इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केली. अर्जातील त्रुटी दूर करून अभ्यासक्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. १० सप्टेंबर रोजी ही यादी राज्य सरकारकडे सादर करण्यात आली. यानंतर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पात्र ७५ विद्यार्थ्यांची निवड केली.

या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय घोषित करण्यात आला. शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशसेवेसाठी आपले कौशल्य वापरावे, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अशा आशयाचे हमीपत्र देणे आवश्यक राहणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेमुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासात मोठी मदत होईल. राज्य सरकारच्या या तातडीच्या आणि सकारात्मक निर्णयाबद्दल ओबीसी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Devendra fadnavis efforts lead to immediate grant of foreign scholarships for 75 obc students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 02:39 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • OBC Scholarship

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
1

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
2

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.