Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस भरतीवेळी तरुणींना मासिक पाळी आल्यास पुन्हा मिळणार संधी; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

महिला पोलीस भरतीवेळी तरुणींना शारीरिक चाचणीवेळी मासिक पाळी आल्यास त्यांना चार ते पाच दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 05:05 PM
Extension of time for young women to get their period during women police recruitment

Extension of time for young women to get their period during women police recruitment

Follow Us
Follow Us:
  • महिला पोलीस भरतीवेळी मासिक पाळी आल्यास मुदतवाढ
  • तरुणींना चार ते पाच दिवसांसाठी मिळणार मुदतवाढ
  • योगेश कदम यांनी जाहीर केला निर्णय
Maharashtra Police Recruitment Menstruation Extension : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला उमेदरावांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. वर्षानुवर्षे अथक मेहनत घेणाऱ्या तरुणींना पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीवेळी मासिक पाळी आल्यास तिची संधी हुकण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे तरुणीला शारीरिक चाचणीवेळी मासिक पाळी आल्यास पुढील चार ते पाच दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस भरतीवेळी मासिक पाळी आल्यास आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यस पोटात कळा, कंबरदुखी किंवा अशक्तपणा येऊ शकतो. या विपरित परिणाम हा धावण्याचा गतीवर होण्याची शक्यता असते. यामुळे राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस भरतीसाठी महिला उमेदवारांकडून अनेक महिने अथक मेहनत घेतली जाते. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणी दररोज धावणे, व्यायाम आणि अन्य शारीरिक सराव करून भरतीची तयारी करतात. मात्र, शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास अनेक महिलांना पोटदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा किंवा अन्य शारीरिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम धावण्याच्या वेगासह शारीरिक कामगिरीवर होण्याची शक्यता असते.

Yogi Adityanath mother passed away : CM योगी आदित्यनाथ यांच्या आईचे उत्तराखंडमध्ये निधन; भाषण सुरू असताना मिळाला निरोप

मेहनत करूनही केवळ त्या दिवसाच्या शारीरिक अडचणीमुळे उमेदवारीची संधी गमावण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येक स्त्रीला कमी-अधिक प्रमाणात मासिक पाळीचा त्रास होत असतो. पण याचा परिणाम पोलीस भरतीच्या संधीवर न होण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

सध्या योगेश कदम यांचे मिशन खाकी सुरू असून या अंतर्गत ते पोलीस भरती व अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरूणींची भेट घेत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत असून शासनामार्फत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. योगेश कदम यांनी मुलांना सरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर आता पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणींसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिला पोलीस भरतीवेळी मासिक पाळी आल्यास काय होणार?

    Ans: शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास आरोग्य तपासणीनंतर संबंधित महिला उमेदवाराला पुढील काही दिवसांत चाचणी देण्याची संधी मिळणार आहे.

  • Que: महिला उमेदवारांना किती दिवसांची मुदतवाढ मिळणार?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

  • Que: महिला पोलिसांबाबत निर्णय कोणी जाहीर केला?

    Ans: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

Web Title: Extension of time for young women to get their period during women police recruitment nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Police
  • Menstrual health
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

पुण्यातील पाणीपुरवठ्याचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टा’त; निर्णयाकडे पुणेकरांचे लागले लक्ष
1

पुण्यातील पाणीपुरवठ्याचा निर्णय थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टा’त; निर्णयाकडे पुणेकरांचे लागले लक्ष

महायुती सरकारला घरचा आहेर! नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यात आरपीआय आठवले गटाचे मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन
2

महायुती सरकारला घरचा आहेर! नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यात आरपीआय आठवले गटाचे मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन

Chandrapur Crime News: चंद्रपुरच्या भर चौकात कापलेले मुंडके, तर रेल्वे पुलाखाली सापडले धड
3

Chandrapur Crime News: चंद्रपुरच्या भर चौकात कापलेले मुंडके, तर रेल्वे पुलाखाली सापडले धड

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा
4

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash Conspiracy: ‘तो’ मफलरवाला कोण? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.