
hostel
वसतिगृहाचे व्यवस्थापन आणि मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन उमेदवारांसाठी अटी व पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये इच्छुक महिला उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, त्यांना रेक्टर कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. मुलींची सुरक्षितता, शिस्त आणि वसतिगृहाचे प्रशासन प्रभावीपणे हाताळण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या रेक्टरने मुलींच्या वसतिगृहात पूर्णवेळ राहणे आवश्यक राहील.
CBSE चा मोठा निर्णय! १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे सॅम्पल पेपर्स जाहीर; असे करा डाऊनलोड
या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना आपला संपूर्ण बायोडेटा, संबंधित कामाचे अनुभव प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन ‘गूगल फॉर्म’च्या (Google Form) माध्यमातून भरावयाचे आहेत.
Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच