Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरण योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अंतिम मुदतीच्या दिवशी महापालिकेत अर्जदारांची गर्दी झाली असून, सायंकाळपर्यंत १२ हजार २०० फाईल प्राप्त झाल्या.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 01, 2026 | 02:52 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • शेवटच्या दिवशी कोट्यवधींचा केला भरणा 
  • १२ ठिकाणीही शुल्क भरण्याची होती व्यवस्था 
  • अनधिकृत प्लॉटधारकांना नियमितीकरणाची संधी 
Sambhajinagar News :  छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंठेवारी नियमितीकरणाच्या अंतिम मुदतीच्या दिवशी नागरिकांनी महापालिकेत मोठी गर्दी केली. आपले प्लॉट आणि घरे नियमित करून घेण्यासाठी दिवसभर अर्जाची धावपळ सुरू होती. या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत सायंकाळपर्यंत तब्बल १०८ कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

शेवटच्या दिवशीच नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम भरल्याने महसुलाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली; मात्र योजनेला मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

शेवटच्या दिवशी कोट्यवधींचा केला भरणा

१५ जुलैपासून सुरू झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण मोहिमेला ३१ ऑक्टोबर ही अतिम मुदत देण्यात आली होती. मुदतीचा शेवटचा दिवस असल्याने शनिवारी महापालिकेच्या नगररचना विभागात अर्जदारांची गर्दी झाली. सायंकाळपर्यंत महापालिकेकडे १२ हजार २०० फाईल प्राप्त झाल्या होत्या.

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

१२ ठिकाणीही शुल्क भरण्याची होती व्यवस्था

रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते. दिवसभरात निरालाबाजार येथील बँकेत नागरिकांनी सुमारे तीन कोटी रुपयांचे चलन भरले, तर महापालिकेच्या कॅश काऊंटरवर एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. याशिवाय शहरातील अन्य १२ ठिकाणीही शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आतापर्यंत जमा झालेला महसूल १०८ कोटी ६३ लाख रुपयांवर पोहोचल्याची माहिती नगररचना विभागातील अधिकाऱ्याऱ्यांनी दिली.

अनधिकृत प्लॉटधारकांना नियमितीकरणाची संधी

शहराच्या हद्दीलगतच्या भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या. विकास आराखडा मंजूर नसलेल्या भागांत अनेक जमीनमालकांनी अनधिकृत प्लॉटिंग करून भूखंडाची विक्री केली. या भूखंडांवर नागरिकांनी घरे बांधून वास्तव्य सुरू केले. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी डिसेंबर २०२० पूर्वी खरेदी केलेले प्लॉट आणि त्यावरील बांधकाम नियमित करण्याची संधी गुंठेवारी योजनेतून देण्यात आली.

योजनेतील मोठ्या दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय महापौर समीर राजूरकर यांनी घेतल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला. त्यामुळे योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, महापालिकेच्या महसुलातही मोठी भर पडली आहे.

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत

Web Title: Chhatrapati sambhajinagar gunthewari scheme 108 crore revenue sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Chhatrapati Sambhajinagar News

संबंधित बातम्या

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण
1

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती
2

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
3

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
4

Farmers Water Crisis : वैजापुरात पाण्यासाठी शेतकरी आक्रमक! नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.