Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

Married Woman Suicide: पतीचे दारूचे व्यसन, परस्त्रीशी संबंध अन् सततच्या मारहाणीला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने आधी विष प्राशन केले आणि नंतर चिमुकल्या मुलीसह गॅलरीतून उडी घेत जीवन संपवले. संभाजीनगरमधील या थरारक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 03, 2026 | 12:16 PM
Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

Married Woman Suicide: विष प्राशन केले, मुलीला सोबत घेतले अन् गॅलरीतून झोकून दिले; संभाजीनगरमधील दुर्दैवी घटनेने हळहळ!

Follow Us
Follow Us:
  • व्यसनाधीन पतीच्या अमानुष मारहाणीला वैतागून आत्महत्या
  • आधी विष प्राशन केले, मग चिमुकलीसह गॅलरीतून उडी मारली
  • भावाच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांत पती विरुद्ध गुन्हा दाखल
Married Woman Suicide: पतीचे दारूचे व्यसन, परस्त्रीशी बोलणे, पत्ते खेळणे आणि यातून होणारी सततची अमानुष मारहाण… या सगळ्या त्रासाला आणि मानसिक छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची अत्यंत मानवी मनाला हेलावून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत घडली आहे. पतीच्या त्रासाला वैतागून विवाहितेने आधी विषारी औषध प्राशन केले आणि त्यानंतर आपल्या चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सुदैवाने चिमुकली सुरक्षित बचावली आहे.

कावेरी ऊर्फ मोनिका दीपक काळे (वय २५, रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर दीपक भागवत काळे असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी मोनिकाचा भाऊ भगवान बाबासाहेब शिंगाडे (वय ३२, रा. चिंचखेड, ता. अंबड, जि. जालना) यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…

काय आहे नेमकी घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाचा विवाह २०१६ मध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील दीपक काळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला. मात्र, त्यानंतर दीपकला दारूचे व्यसन जडले. शिवाय तो परस्त्रीशी बोलत असे आणि जुगार (पत्ते) खेळण्याच्या व्यसनामुळे सतत कर्जबाजारी व बेफिकीर झाला होता. या कारणांवरून तो मोनिकाला सतत शिवीगाळ व अमानुष मारहाण करू लागला.

पतीकडून होणाऱ्या या सततच्या छळाची माहिती मोनिकाने अनेकदा माहेरच्या लोकांना दिली होती. त्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी (भाऊ, आई-वडील व नातेवाइकांनी) वेळोवेळी येऊन दीपकची समजूत काढली आणि त्याला वागणुकीत सुधारणा करण्यास सांगितले. मात्र, त्याच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला.

हेही वाचा: Cyber Fraud News: बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे सायबर फसवणुकीचा शिकार; बँक खात्यातून परदेशातून झाले ६ व्यवहार!

विष प्राशन करून गॅलरीतून मारली उडी

घटना घडली त्या रात्री, म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास, या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून मोनिकाने टोкаचे पाऊल उचलले. तिने सर्वप्रथम विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर आपल्या लहान चिमुकल्या मुलीला सोबत घेऊन भाड्याने राहत असलेल्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली.

या भीषण घटनेत चिमुकल्या मुलीला सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु मोनिका स्वतः गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच घरमालक व नातेवाइकांच्या मदतीने तिला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी (घाटी शासकीय रुग्णालय) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर अतिदयनीय अवस्थेत उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत मोनिकाचा भाऊ भगवान शिंगाडे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पती दीपक काळे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी (कलम ३०६ नुसार) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुलसिंग गुसिंगे करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत घडली आहे.

  • Que: मृत विवाहितेचे नाव काय असून तिने काय पाऊल उचलले?

    Ans: मृत विवाहितेचे नाव कावेरी उर्फ मोनिका दीपक काळे (वय २५) असे आहे. तिने पतीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून चिमुकल्या मुलीसह गॅलरीतून उडी मारली, ज्यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

  • Que: याप्रकरणी पोलिसांनी कोणावर कारवाई केली आहे?

    Ans: मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पती दीपक भागवत काळे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Chhatrapati sambhaji nagar married woman suicide husband harassment sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news
  • Married Woman Suicide
  • Woman Harassments

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?
1

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार! कुटुंबावर गोळीबार अन् तलवारीने हल्ला; नेमकं काय घडलं?

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…
2

गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांचा डाव; मोबाईलवर एपीके फाईल पाठवली अन्…

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…
3

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई
4

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.