फोटो सौजन्य - Social Media
इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही भारताची प्रमुख गुप्तचर संस्था असून या विभागात नोकरी करण्याचे स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात असते. अशाच उमेदवारांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. IB ने ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड II / एग्जीक्युटिव्ह (ACIO-II/Executive)’ या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 3717 पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या पदांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 27 वर्षांदरम्यान असावी. मात्र, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयात सूट दिली जाणार आहे. पात्रता ही एक गोष्ट आहे, मात्र अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे देखील लागणार आहेत. या भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे.
IB ACIO भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. तसेच, 12 आठवड्यांपेक्षा जुना नसलेला पासपोर्ट साइज फोटो (100-200KB jpg/jpeg), स्वाक्षरीचा स्कॅन (80-150KB jpg/jpeg), आधार कार्ड, पॅन, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखा कोणताही ओळखपत्र, दहावी, बारावी व पदवीच्या मार्कशीट्स, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (EWS असल्यास), NOC (जर उमेदवार आधीच नोकरीत असेल) आणि वयातील सूट हवी असल्यास संबंधित प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज mha.gov.in किंवा ncs.gov.in या संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. अर्ज शुल्क दोन भागात विभागले आहे. अनारक्षित, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील पुरुष उमेदवारांना एकूण ₹650 भरावे लागतील (₹550 प्रोसेसिंग + ₹100 परीक्षा शुल्क). तर SC, ST, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना केवळ ₹550 प्रोसेसिंग शुल्क भरावे लागेल. ही एक प्रतिष्ठेची सरकारी नोकरी असून देशाच्या सुरक्षेसाठी सेवा देण्याची संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी हातून जाऊ देऊ नये.